आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव पाण्याच्या टँकरने दिली दुचाकीला जोराची धडक, तरुण जागीच ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - भरधाव पाण्याच्या टँकरने समोरील दुचाकीला मागून जोराची धडक दिली. त्यात दुचाकीस्वार दिनेश सुखदेव घुगे (२१, रा.वडगाव कोल्हाटी) जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र कृष्णा देविदास मिरगे (२२) गंभीर आहे. त्याच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. मृत दिनेशवर त्याच्या सासेगाव (तालुका कन्नड) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. टँकरचालक फरार असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक जी. बी. खंडागळे यांनी दिली.

दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर दिनेश तीन वर्षांपासून नोकरीनिमित्त वडगाव कोल्हाटी येथे राहत हाेता. तो एका छोट्या कंपनीत हेल्पर होता. मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दिनेश आणि त्याचा मित्र कृष्णा मिरगे हे दोघे दुचाकीवरून(एमएच २० डीयू ६९२९) घरी जात होते. दरम्यान, त्यांची दुचाकी कोलगेट चौकात येताच मागून भरधाव आलेल्या पाण्याच्या टँकरने (एमएच १८ एम ११३१) समोरील दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात दुचाकी चालवणाऱ्या दिनेशचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मित्र कृष्णाला तत्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून घाटीत दाखल केल्यामुळे त्याचे प्राण वाचल्याची माहिती दिनेशच्या नातेवाइकांनी दिली.
पुढे वाचा... पल्सरस्वारांनी लुटले व्यापाऱ्याचे लाख
बातम्या आणखी आहेत...