आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एन-5 च्या जलकुंभावरून पाणी चोरी, रात्री साडेनऊ वाजेपासून सकाळी चार वाजेपर्यंत सुरू होती प्रक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे एन-५ च्या जलकुंभावरून पाच टँकरने गेल्या पंधरा दिवसांपासून पाण्याची चोरी होत असल्याचा प्रकार गुरुवारी रात्री ९.३० वाजता समोर आला. याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी टँकर जप्त केले. पहाटे चार वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. 
 
एन-५ च्या जलकुंभ परिसरात रात्री पंधरा दिवसांपासून टँकरची संख्या दिसत होती. त्यात गुरुवारी नऊ वाजता पाणीपुरवठा अभियंता सरताजसिंग चहल यांना भ्रमणध्वनीवरून कॉल आला. यात पाच टँकर मनपाने नियुक्त केलेल्या ठेकेदारांपैकी नसल्याचे सांगितले. त्यावर चहल यांनी शाखा अभियंता गिरी यांच्यासह एन-५ येथे भेट दिली. या वेळी पाण्याची चोरी करणारा दुसरा कुणी नसून सिटी वॉटर युटिलिटीचा उपकंत्राटदार पाणी चोरी करत असल्याचा प्रकार समोर आला. शेख अक्रम हा गेल्या पंधरा दिवसांपासून हे काम करत असल्याचे दिसून आले. पाणी चोरी करून परस्पर टँकर विक्री करत असल्याचेही या वेळी दिसून आले. 
 
रात्री चहल यांनी जलकुंभाला भेट दिली असता हा प्रकार समोर आला. त्यांनी तत्काळ सिडको पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी टँकरची हवा सोडून घटनेचा पंचनामा केला. शुक्रवारी पहाटे दोन वाजता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. यात पुन्हा शिफ्ट चेंजमुळे पहाटे चार वाजेपर्यंत अधिकारी चहल गिरी यांच्यासह कर्मचाऱ्यांना थांबावे लागले. गिरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून सिडको पोलिसांनी शेख अक्रम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
बातम्या आणखी आहेत...