आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Water Tanker Supply Issue In Satara Devlai Area Aurangabad

प्रचार फंडा : सातारा देवळाई न.प.ची निवडणूक रद्द होताच टँकर घटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा देवळाई नगर परिषदेची निवडणूक होण्याआधी राजकीय पुढाऱ्यांनी सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांसाठी पाण्याचे टँकर सुरू केले होते. मात्र, नगर परिषद निवडणूक रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर राजकीय पुढाऱ्यांनी पाण्याचे टँकर अचानक बंद केल्याचे चित्र सध्या सातारा देवळाईमध्ये पाहायला मिळत आहे.

३ फेब्रुवारी रोजी सातारा देवळाईची नगर परिषदेचे निवडणूक वाॅर्ड आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यानंतर राजकीय पुढाऱ्यांनी अधिकृत पक्षाच्या तिकिटासोबतच प्रचाराच्या पार्श्वभूमीवर
आपापल्या सोयीच्या वाॅर्डांमध्ये मोफत पाण्याचे टँकर पुरवणे सुरू केले होते. त्यामुळे प्रचाराच्या निमित्ताने का होईना, रहिवाशांना पाणी मिळण्यास सुरुवात झाली होती; परंतु काही दिवसांतच शहरातील शिवसेना, भाजपतर्फे सातारा देवळाईचा महानगरपालिकेत समावेशासाठी प्रयत्न सुरू केले आणि मुख्यमंत्र्यांकउून त्याला अधिकृत परवानगी मिळाल्याचे जाहीर होताच राजकीय पुढाऱ्यांचे नगर परिषदेचे स्वप्न इतिहासजमा झाले.
निवडणूक आयोगाने अधिकृत जाहीर केले नसले तरी लवकरच या भागाचा समावेश मनपात होणार आहे. त्यामुळे उगीच पैसा खर्च करण्याचे टाळले जात असल्याचे राजकीय गोटातून बोलले जाते.
पाण्याचे दर वाढले

सध्या नगर परिषदेतर्फे पुरवले जाणारे ९ टँकर ५५ हजार लोकसंख्या असलेल्या सातारा देवळाई साठी अपुरे पडत आहे. एकीकडे नगर परिषद व राजकीय पुढारी निवडणुकीच्या कामात गुंग असताना नागरिकांचे पाण्यामुळे प्रचंड हाल होत आहे. राजकीय पुढाऱ्यांनी टँकर पुरवणे बंद करताच व निवडणूक रद्द होण्याचे चिन्ह दिसताच काही पाणी विक्रेत्यांनी पाण्याच्या टँकरच्या दुप्पट किमती वाढल्या असल्याचे नागरिकांनी सांगितले.