आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्यापासून पेट्रोल, मधुमेहावरही होणार स्वस्तात उपचार

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठाच्या नॅनो टेक्नॉलॉजी विभागाने पाण्यापासून पेट्रोल तयार करण्यावर संशोधन सुरू केले आहे. त्यामध्ये अत्यंत क्लीन, पोल्युशनफ्री असलेला हायड्रोजन पाण्यातून विघटित करून इंधन तयार केले जाणार आहे. पाणी म्हणजेच एचटूओमधून दोन्ही हायड्रोजनचे विघटन करून पाणी वेगळे केल्यावर हायड्रोजन इंधन तयार होते. हे इंधन प्रदूषणमुक्त असेल. तसेच ते सर्वसामान्यांना परवडणारे असेल. भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. प्रकाश खिराडे, नॅनो टेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. रामपाल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्राध्यापक एकत्र येऊन हे संशोधन करत आहेत.
स्वस्तात मिळणार मधुमेहावरील औषध : बदलती जीवनशैली आणि वाढत्या लोकसंख्येसोबतच मधुमेह आणि क्षयरोग रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. सद्य:स्थितीत या रोगांवर उपलब्ध औषधांमध्ये अँटिबायोटिक्स असतात. या महागड्या अँटिबायोटिक्समुळे या औषधाच्या किमतीही जास्त आहेत. मात्र, ही औषधी जुनी असली तरी त्याचा वापर ज्या रोगांच्या जंतूंवर होतो, त्या जीव-जंतूंनी आपली प्रतिकारशक्ती वाढवली आहे. या औषधांमध्ये प्रामुख्याने रोशी गिल्टासोन, नप्रॉक्सिन इथाम ब्युटॉन इत्यादी पदार्थांचा वापर करण्यात येतो; पण सध्या मधुमेह आणि क्षयरोगाचे प्रमाण वाढले आहे. म्हणून हे औषध या आजारांवर पुरेशी ठरत नाहीत. त्यामुळे विद्यापीठ त्यावरही संशोधन करणार आहे. या संशोधनात औषधांची मूळ फ्रेम तीच असणार, फक्त याच्या स्ट्रक्चरमध्ये थोडाफार बदल करून या औषधांची प्रतिकारक्षमता वाढवली जाणार आहे. तसेच इन्फर्मेंटरी एजंटवरही संशोधन सुरू आहे. या संशोधनासाठी यूजीसी, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी व विद्यापीठ अनुदान देत आहे. या संशोधनात डॉ. अनिल घुले, डॉ. रामपाल शर्मा, डॉ. अंजली साठे यांचा मोठा वाटा आहे.
सौर ऊर्जा साठवणार बॅटरीत : जगभरामध्ये विद्युत ऊर्जा निर्माण करण्यावर अनेक संशोधने सुरू आहेत. सूर्यापासून मिळणारा प्रकाश हा ऊज्रेचा चांगला स्रोत आहे. वर्षभर आणि सर्वत्र तो उपलब्ध असतो. अत्यंत स्वस्तात आणि सर्वत्र उपलब्ध असणार्‍या या स्रोताचा वापर घर प्रकाशमान करण्यासाठी होऊ शकतो. वाढत्या भारनियमनाला आळा बसावा यासाठी सूर्यकिरणांचा वापर या संशोधनातून केला जाणार आहे. यात प्रामुख्याने दोन इलेक्ट्रॉड व केमिकल सोल्युशनच्या रासायनिक रिअँक्शनमध्ये सूर्यप्रकाशाची मदत घेण्यात आली आहे. या प्रकियेमुळे तयार होणारी वीज बॅटरीत साठवून घराघरात पोहोचवण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. हे संशोधन रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. चरणसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. राम शिंदे, प्रा. डॉ. भास्कर साठे, प्रा. अंजली राजघोष आणि विद्यार्थी करत आहेत.