आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाॅटर युटिलिटी बँक गॅरंटी जप्तीस अंतरिम स्थगिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरात पाणीपुरवठा करणारी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने महापालिकेविरोधात जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या निकालाविरोधात खंडपीठात दाखल अपिलावर सुनावणीदरम्यान न्या. टी. व्ही. नलावडे यांनी कंपनीची बँक गॅरंटी महापालिकेने जप्त करण्यास अंतरिम स्थगिती देत पुढील सुनावणी ऑक्टोबरला होईल.
करारानुसार लवादाची नेमणूक होईपर्यंत मनपाला कोणतीही कारवाई करण्यास मनाई करण्यात यावी आणि कंपनीची बँक गॅरंटी जप्त करण्यास मनाई करण्यात यावी, अशी विनंती केली होती. यावर सुनावणीअंती जिल्हा न्यायालयाने कंपनीचे म्हणणे अंशतः मंजूर केले आणि लवादाची प्रक्रिया सुरू असताना मनपाने करारात नमूद अटींचे पालन केल्याशिवाय कंपनीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करू नये, असे आदेश दिले. अॅड. अनिल बजाज यांनी काम पहिले. कंपनीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. विजयसिंग थोरात, अॅड. राहुल तोतला, अॅड. स्नेहल तोतला यांनी बाजू मांडली.
बातम्या आणखी आहेत...