आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘समांतर’ प्रकरणी २६ जुलैला जिल्हा कोर्टात सुनावणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद - सिटी वॉटर युटिलिटी कंपनी लि. ने जिल्हा न्यायालयात दाखल केलेला अर्ज गुरुवारी (१४ जुलै) कोर्टासमोर आला असता या अर्जावर २६ जुलैला सुनावणी ठेवण्यात आली आहे. कंपनीविरुद्ध महापालिका प्रशासनाने एकतर्फी कारवाई करू नये. कंपनीची ७९.२२ कोटी रुपयांची बँक गॅरंटी जप्त करू नये, असे आदेश प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश राजीव व्ही. देशमुख यांनी यापूर्वीच दिले आहेत. मनपातर्फे अॅड. दीपक पडवळ अॅड. एस. आर. नेहरी यांनी बाजू मांडली. कंपनीतर्फे अॅड. रामेश्वर तोतला यांच्यासह अॅड, राहुल तोतला, अॅड. स्नेहल तोतला, आर. टी. लिगल फर्मतर्फे अॅड. विकास भाले अॅड. अंकुश मानधनी यांनी काम पाहिले.
बातम्या आणखी आहेत...