आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलवाहिनी पुन्हा फुटली; जुन्या शहरात निर्जळी, एक दिवस विलंबाने होईल पाणीपुरवठा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेल्वेस्टेशनजवळील उड्डाणपुलाखाली रविवारी रात्री मुख्य जलवाहिनी फुटल्यानंतर रात्रीतून कामाला सुरुवात करण्यात आली. - Divya Marathi
रेल्वेस्टेशनजवळील उड्डाणपुलाखाली रविवारी रात्री मुख्य जलवाहिनी फुटल्यानंतर रात्रीतून कामाला सुरुवात करण्यात आली.
औरंगाबाद - शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० आणि १४०० मि. मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी रेल्वे उड्डाणपुलाखाली रविवारी रात्री १२ वाजता फुटल्याने शहरात येणारे पाणी बंद करण्यात आले. त्यामुळे सोमवारी जुन्या शहरात निर्जळी होती. तसेच मंगळवारीही हडको-सिडकोच्या काही भागांत निर्जळी राहणार आहे.
 
गेल्या महिन्यातील खंडनकाळात जलवाहिन्यांची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतरही जलवाहिनी फुटण्याचे प्रकार वाढले आहेत. चितेगावपासून शहरापर्यंत तीन वेळा मुख्य जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे शहरवासीयांना दोनदा निर्जळीचा सामाना करावा लागला.
 
महानगरपालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांकडून रविवारी रात्री बारा वाजेपासूनच युद्धपातळीवर दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरूच होते. पहाटे चारपर्यंत शहरात पाणी येईल, असे सूत्रांनी सांगितले. कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांच्या मार्गदर्शनाखाली सुहास जोशी, के. एम. फालक अन्य कर्मचारी अधिकारी दुरुस्तीचे काम करत आहेत.
 
पूर्ण वेल्डिंग निखळले : रेल्वे उड्डाण पुलाखाली फारोळ्याहून शहरात येणाऱ्या १४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी टी लावून जोडली आहे. त्या ठिकाणी पूर्वीपासून पाणी गळती होती. पाण्याच्या दबावाने जलवाहिनीची झीज झाल्याने रविवारी रात्री मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली. झिजलेला पाइप कापून तेथे नवीन पाइप टाकून वेल्डिंग केले जात होते.
 
या भागात येणार पाणी : ज्याभागाला सोमवारी पाणी मिळणार होते त्यांना मंगळवारी पाणी मिळेल, तर ज्यांना मंगळवारी पाणी मिळणार होते त्यांना बुधवारी पाणी दिले जाणार आहे. बेगमपुरा, जयसिंगपुरा, शांतीपुरा, बिल्डर हाउसिंग सोसायटी, आशानगर, नंदनवन कॉलनी, काचीवाडा, कोतवालपुरा, नूर कॉलनी, कोहिनूर कॉलनी, बनेवाडी, फुलेनगर, एकनाथनगर, तुलसी अपार्टमेंट, नागसेननगर, मिलिंदनगर, वेदांतनगर, सादातनगर, हमालवाडा, एन-३, ठाकरेनगर, विठ्ठलनगर, शास्त्रीनगर, बौद्धनगर, उत्तमनगर, जवाहर कॉलनी, व्यंकटेशनगर, शांतीनगर, वसंतनगर, विष्णूनगर, खिवंसरा पार्क, निरंजन हाउसिंग सोसायटी, वर्धमान रेसिडेन्सी, श्रीकृष्णनगर, मयूरबन कॉलनी, देशपांडेपुरम, गादियाविहार, चाणक्यपुरी, मेडिकल हाउसिंग सोसायटी, गुरुकृपा हाउसिंग सोसायटी, विश्वभारती कॉलनी, चेतक घोडा परिसर, भानुदासनगर, बिग बाजारमागील परिसर, विष्णूनगर, आकाशवाणी या भागात मंगळवारी पाणी मिळेल.

 
 
बातम्या आणखी आहेत...