आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहाडसिंगपुऱ्यातील वस्त्यांसारखी आमची अवस्था करू नका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वाल्मीमागील डोंगरातून धुळे-सोलापूर महामार्ग जात आहे. भूमाफियांनी पोटखराब जमिनीवर प्लॉटिंग पाडून ते सर्वसामान्यांना विकले आहेत. बेगमपुऱ्यातील पहाडसिंगपुऱ्याप्रमाणे आमची अवस्था होता कामा नये. एकतर आम्हाला पर्यायी जागा द्या किंवा आमची घरे वाचवा, असे म्हणत सुमारे पाचशे नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आक्षेप अर्ज दाखल केले.

सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग शहरातून जात आहे. मात्र, या महामार्गामुळे वाल्मीमागील गट क्रंमाक ५२ मधील शेकडो लोकांची २० बाय ३० ची घरे आहेत. हा मार्ग याच जागेतून जाणार असल्याने आम्ही बेघर होणार असून आम्हाला पर्यायी जागा द्या किंवा आमची घरे वाचवा, असा टाहो आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी फोडला. तसेच वाल्मीसमोरील रस्त्यावर उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या डिझाइनमध्ये चुका असल्याने तो रद्द करून मूळ नकाशाप्रमाणे पूल तयार करावा, अशी मागणीही परिसरातील नागरिकांनी केली आहे.

शंभरवर आक्षेप दाखल
गुरुवारीभूसंपादन अधिकारी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांच्यासमोर आक्षेप अर्जांवर सुनावणी झाली. सुमारे शंभरावर नागरिकांनी आक्षेप अर्ज दाखल केले. सुरुवातीला उड्डाणपुलाच्या डिझाइनबद्दल आक्षेप घेण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. कार्यकारी अभियंता संदीप पाटील यांच्या मते पुलाचे डिझाइन बरोबर असून त्यात काही अंशी बदल करण्याची शक्यता आहे. मात्र, डिझाइन पूर्णत: बदलण्याच्या मागणीवर नकार देत पुन्हा आक्षेप दाखल करण्याचे आवाहन केले.

प्राधिकरणाने केली चूक मान्य..
महामार्गात तयार होणाऱ्या उड्डाणपुलाचे डिझाइन काही अंशी चुकलेले असले तरी चर्चेअंती त्यात बदल केला जाईल. याउपरही काही आक्षेप असतील तर नव्या डिझाइनवर आक्षेप दाखल करावा, असेही त्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना सुचवले.

तोडगा काढणार...
अाज३-ए नुसार केलेल्या नोटिफिकेशनवर आक्षेप आले होते. ३-डी नुसार प्रत्यक्ष मोजणीनंतर ज्यांची जागा जाईल त्यावर पुन्हा आक्षेप अर्ज दाखल होऊन त्यावर तोडगा काढला जाईल. वाल्मीमागील गट क्र. ४८ मधील लोकांनी घरे वाचवण्यासाठी अर्ज दाखल केला. रवींद्रपरळीकर, उपजिल्हाधिकारी
५०० नागरिकांचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात आक्षेप अर्ज दाखल