आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर खरेदीचे आदेश मिळाले, बारदाने कधी मिळणार ?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण- बाजार समितीला तूर खरेदी करण्याचे शासनाचे आदेश मिळाले. परंतु बाजार समितीत बारदानेच शिल्लक नसल्याचे येथील तूर खरेदीचा प्रश्न कायम असल्याने शेतकऱ्यांवर अजूनही चिंतेचे सावट आहे. बारदाने कधी मिळणार यासाठी अजूनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
 
तालुक्यातील साडेआठ हजार क्विंटल तूर अद्याप खरेदी होणे शिल्लक आहे. साडेतीनशे शेतकरी आठ दिवसांपासून बाजार समितीत आपल्या तुरीची वाहने घेऊन मुक्कामी आहेत.  तूर केंद्र सुरू झाल्यापासून सावळा गोंधळच चालू आहे. तीन महिन्यांत केवळ ४२ दिवस तूर खरेदी केंद्र सुरू राहिले. २५ दिवस बारदान्याअभावी तसेच अगोदर व्यापाऱ्यांच्या तुरी खरेदीला ग्रेडरने प्राधान्य दिल्याने ग्रेडर आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याने दीड दिवस ग्रेडरने तूर  खरेदी बंद केली होती. हा वाद निवळताच तूर खरेदी केंद्र बंद झाले. तरीही पास घेऊन असलेले साडेतीनशे शेतकरी आठ दिवसांपासून बाजार समितीत आपल्या तुरीची वाहने घेऊन मुक्कामी आहेत. तसेच अजूनही काही शेतकरी तूर विक्री करण्यासाठी रांगा लावून आहेत. गुरुवारी तूर खरेदीचे आदेश आले असले तरी यात ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर तुरीचा पेरा असेल त्यांचीच तूर खरेदी करण्याच्या सूचना करण्यात आल्याने समितीत मुक्कामी असणाऱ्याच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे.    

ग्रेडरने मारला डल्ला : ग्रेडरने प्रति शेतकरी १०० ते २०० रुपये क्विंटल तुरीमागे घेतले असल्याची बाब काही शेतकऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली.
 
बाजार समितीने केली पाणी, नाष्ट्याची सोय  
शेतकरी आपल्या गावाकडे रोज जाऊ शकत नसल्याने तुरीच्या वाहनाचा रोजचा खर्च व त्यातच पैठण येथे मुक्कामी खर्चाने शेतकरी मोडकळीस आला आहे. याचा विचार करून बाजार समितीने आज येथे शेतकऱ्यांना  पिण्यासाठी पाणी व नाष्ट्याची साेय केली आहे.   
 
नोंद केलेल्यांचीच हाेणार तूर खरेदी  
- शासनाचे आदेश प्राप्त झाले. बारदाने उपलब्ध होताच नोंद केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी केली जाईल.
 -नितीन विखे, सचिव, बाजार समिती, पैठण.
बातम्या आणखी आहेत...