आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • We Not Go With Them, BJP Come With Us Ramdas Athawale

आम्ही त्यांच्याबरोबर गेलो नाही, भाजपच आमच्यासोबत आला - रामदास आठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमखास मैदान येथे झालेल्या सभेत रामदास आठवले, बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात आदी. - Divya Marathi
आमखास मैदान येथे झालेल्या सभेत रामदास आठवले, बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात आदी.
औरंगाबाद - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही सत्तेसाठी भारतीय जनता पक्षासोबत गेलेली नाही, तर गरज होती म्हणून भाजपच आमच्यासोबत आली आहे. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाहीत, स्वबळावर सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे पक्षाध्यक्ष, खासदार रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. भविष्यात रिपब्लिकन पक्षांनी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त पक्षाच्या वतीने कन्याकुमारी येथून काढण्यात आलेल्या यात्रेदरम्यान आठवले मंगळवारी शहरात होते. येथील आमखास मैदानावर झालेल्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर सीमा आठवले, बाबूराव कदम, मिलिंद शेळके, माजी उपमहापौर किशोर थोरात, संजय ठोकळ आदी उपस्थित होते.

पुढे वाचा... आंबेडकरी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असून त्यासाठी