आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळजी करू नका, वृद्धांची देखभाल आम्ही करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- "मीआणि माझी पत्नी दोघेही नोकरी करतो. सर्व सुखसोयी आहेत. पण नोकरीवर असतानाही लक्ष घरी लागून राहते. कारण आईवडिलांचे वय झाले आहे. त्यांची काळजी घ्यायला कुणीतरी राहायला हवे. मात्र, आजच्या काळात मुलांचे शिक्षण आणि महागाईशी दोन हात करायचे तर दोघांनाही काम करणे अनिवार्य आहे,' असा संवाद अनेक कुटुंबांतून ऐकायला मिळतो. पर्याय मात्र कुणाकडेच नाही. आता याला उत्तर मिळाले आहे. वार्धक्यशास्त्र या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमातून वृद्धांची काळजी घेणारे मनुष्यबळ तयार झाले आहे. याविषयीचा लक्ष वेधून घेणारा कार्यक्रम रविवारी हेडगेवार रुग्णालयात झाला. यामुळे औरंगाबादकरांच्या सेवेत वृद्धांची आपुलकीने शास्त्रोक्त काळजी घेणारे १६ जण तयार झाले आहेत.

टाटा समाजविज्ञान संस्था, वृद्धांसाठी कार्य करणारी आस्था फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार रुग्णालयाच्या सावित्रीबाई एकात्मिक विकास मंडळाच्या माध्यमातून वृद्धांची काळजी घेणारे मनुष्यबळ तयार करणारा एक विशेष कोर्स तयार करण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या या कोर्समध्ये १७ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यांना प्रमाणपत्र देण्याचा सोहळा रुग्णालयाच्या दामूअण्णा दाते सभागृहात झाला. या वेळी जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह, अपर जिल्हाधिकारी पी. एस. सोरमाने, हेडगेवारचे डॉ. अनंत पंढेरे, डॉ. आनंद फाटक, टाटा इन्स्टिट्यूटच्या नसरिन रुस्तुमफ्राम, आस्था फाउंडेशनचे अध्यक्ष गिरीश हंसनाळ यांची उपस्थिती होती.

वार्धक्यशास्त्राविषयी कोर्स उत्तीर्ण झालेल्यांना प्रमाणपत्र देताना जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह.

औरंगाबादेत याची गरज
शहरातील६५ टक्के महिला नोकरीनिमित्त बाहेर पडतात. कुटुंबातील ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी घरी कुणीतरी प्रशिक्षित व्यक्ती मिळाल्यास खूप फायदा होईल. ज्येष्ठांच्या प्रकृतीची चिंता राहणार नाही. ते गुणवत्तापूर्ण आयुष्य अनुभवतील. डॉ.प्रतिभा फाटक, सावित्रीबाईफुले एकात्मिक विकास संस्था

समाजोपयोगी प्रशिक्षण
आस्थाफाउंडेशनच्या वतीने वृद्धांसाठी विशेष कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. गुणवत्तापूर्ण आयुष्य देता यावे याविषयी आम्ही विचार करत होतो. टाटा इन्स्टिट्यूटशी करार करून हे प्रशिक्षण आयोजित केले आहे. सर्व १७ मुलांचा खर्च आस्थाने दात्यांच्या मदतीने केला आहे. ही मुले लगेचच समाजात सेवा देतील. यानंतर महिन्यांनी पुढची बॅच सुरू होणार आहे. आशिषगर्दे, आस्थाफाउंडेशन

८० वर्षांवरील वृद्धांना होईल मदत
टाटाइन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आम्ही विविध सामाजिक सर्वेक्षणे करत असतो. तरुणांचा देश असलेला भारत २०४० मध्ये ८० वर्षांवरील वृद्धांचा देश असेल. अशा वेळी त्यांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ असणे गरजेचे आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातून आम्ही मनुष्यबळ निर्मिती करत आहोत. वार्धक्यशास्त्र, वार्धक्यातील काळजी, समस्या आणि संकल्पना यामध्ये शिकवण्यात आल्या. वृद्धांची निगा ठेवणे, हे यामध्ये शिकवण्यात आले आहे. नसरिनरुस्तुमफ्राम, टाटासमाजविज्ञान केंद्र

वृद्धांसाठीही डे-केअरची संकल्पना हवी : वीरेंद्र सिंह
कामानिमित्तपती-पत्नी दोघेही घराबाहेर पडत आहेत. वृद्ध आईवडील आता एकटे पडले आहेत. काळाची गरज ओळखून तयार करण्यात आलेले हे नवे प्रशिक्षण आगामी काळात उपयुक्त सिद्ध होणार आहे. लहान मुलांप्रमाणे वृद्धांसाठी डे-केअर सेंटर असायला हवे, अशी अपेक्षा या वेळी जिल्हाधिकारी वीरेंद्र सिंह यांनी व्यक्त केली. संवादाची साखळी खंडित झाल्याने मूल्यांचे रूपांतरण पुढच्या पिढीपर्यंत होत नाही याविषयी त्यांनी खंतही व्यक्त केली. संवाद हे मानवी आरोग्यासाठी अतिशय प्रभावी औषध आहे, असे ते म्हणाले.