आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेट्यांऐवजी हेल्मेट घालून शिवजयंतीत सहभागी व्हा, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांचे आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गटातटाच्या राजकारणामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे कुठलेही मतभेट, गटतट ठेवता एकत्रितच शिवजयंती साजरी करा. मिरवणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या दुचाकीस्वारांनी फेट्याऐवजी हेल्मेट परिधान करून आदर्श निर्माण करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी महोत्सव समितीला केले. शुक्रवारी पोलिस आयुक्तालयात शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी आयोजकांशी संवाद साधला. 

१९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त वाहन रॅली काढण्यात येते. नवीन औरंगाबाद उत्सव समितीने स्वतंत्र मिरवणूक काढण्यासाठी अर्ज केला आहे, परंतु स्वतंत्र परवानगी मिळणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. 
बातम्या आणखी आहेत...