आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आता संकेतस्थळही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वर्गात अनुपस्थित राहणार्‍या विद्यार्थिनींची माहिती एसएमएसद्वारे पालकांना कळवण्याच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शहरातील काही शाळांनी यापुढचे पाऊल टाकले असून संकेतस्थळ निर्मितीचा मानस व्यक्त केला. विशेष म्हणजे त्यावर ‘पॅरेंट्स कार्नर’ अशी लिंक असेल. त्यात पाल्यांच्या प्रगतीसाठी पालकांना सूचना करण्यात येतील.

‘एसएमएसद्वारे कळणार मुलींची वर्गातील गैरहजेरी’ या मथळ्याखाली ‘दिव्य मराठी’त सोमवारी वृत्त प्रकाशित झाल्यानंतर आणखी तीन शाळांनी एसएमएस सुविधा सुरू करण्यासाठी उत्सुकता दाखवली. तर पायोनिअर्स सेकंडरी स्कूलने एसएमएस सुविधेसह संकेतस्थळ निर्माण करणार असल्याचे सांगितले. या उपक्रमाद्वारे वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यास मदत होणार आहे.

भविष्यात उपयोग
शाळेचे संकेतस्थळ सुरू केले आहे. आज प्रत्येकाच्या घरात मोबाइल असल्याने माहिती देणे सोपे होते. त्यामुळे गैरहजर राहणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांशी शिक्षक थेट संवाद साधतात. या उपक्रमास आमच्या शाळेत अद्याप हवा तसा प्रतिसाद नाही. परंतु भविष्यात याचा नक्कीच उपयोग होईल.
- रामनाथ पंडुरे, मुख्याध्यापक, ज्ञानेश विद्यामंदिर.

संकेतस्थळ सुरू करू
शाळेत संकेतस्थळ निर्मितीचे काम सुरू आहे. यावर ‘पॅरेंट्स कार्नर’ म्हणून लिंक असेल. त्यात पालकांसाठी विशेष सूचना असतील. विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीसंदर्भात पालकांना थेट ई-मेल, एसएमएस पाठवण्याचा मानस आहे. पालकांशी संवाद साधणे सोपे होईल.
-संदीप कुलकर्णी, अध्यक्ष, पायोनिअर्स सेकंडरी स्कूल.

थेट पालकांना फोन
आतापर्यंत एसएमएस सुविधा उपलब्ध केलेली नाही. परंतु अनुपस्थित असणार्‍या विद्यार्थ्यांच्या पालकांना थेट फोन करून माहिती देतो.
- फादर रॉड्रिक्स, सेंट फ्रान्सिस स्कूल.

एसएमएस सुविधा सुरू करू
तंत्रज्ञानाचा उपयोग घेऊन उत्तम पिढी घडवायची असेल तर अशा प्रकारचे उपक्रम राबवावेत.एसएमएस सुविधा लवकरच सुरू करू.
-एस.पी. जवळकर, मुख्याध्यापक, ज्ञानप्रकाश विद्यामंदिर.