आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा प्रवाह: लग्न समारंभात आता अत्याधुनिक ‘रुखवत’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पूर्वीपासूनच वधूपक्षातर्फे मुलींना संसारोपयोगी वस्तू दिल्या जातात. काळ बदलला पण प्रथा बदलल्या नाहीत. लग्नात रुखवत म्हणून कलाकुसरींच्या वस्तूसोबत आता इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह मल्टिफंक्शन मोबाइल, हाय डेफिनेशन कॅमेरा, आयपॅड, लॅपटॉप, एलसीडी, एलईडी अशा वस्तू देण्याचा टेंड्र सुरू झाला आहे.
मुलींना संसारोपयोगी वस्तू देण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. पूर्वी जावयाला जमिनीचा तुकडा, गाय किंवा शेळ्या दिल्या जात होत्या. काळ बदलताच त्याऐवजी सुवर्ण आभूषण देण्याची प्रथा सुरू झाली. रुखवत म्हणून विविध आकाराची भांडी, गृहसजावटीसाठी शोभेच्या वस्तू दिल्या जाऊ लागल्या, परंतु आता काळानुसार हायटेक संसारोपयोगी वस्तू देण्याचा टेंÑड निर्माण झाला आहे. मल्टिफंक्शन मोबाइल, हाय डेफिनेशन कॅमेरा, आयपॅड, लॅपटॉप, एलसीडी, एलईडी अशा वस्तू देण्याचे प्रमाणही वाढले आहे.
अत्याधुनिक सोयीयुक्त गॅजेटच्या वापराने कामात सुबकता, गती येण्यासोबतच स्टेटस सिंबॉल म्हणूनही या वस्तूंकडे पाहिले जाते. अद्ययावत किचनसाठी लागणार्‍या वस्तू खरेदीचा कल वाढला आहे. मिक्सरची जागा आता फू ड प्रोसेसरने घेतली आहे. याबरोबरच मायक्रोवेव्ह, बिटर, टोस्टरसारख्या वस्तूंनी घेतली आहे. बदलत्या जीवनशैलीचा परिणाम विवाह समारंभांवर होत आहे.

एलसीडी, एलईडींना सर्वाधिक मागणी
"मुलीच्या संसारासाठी वधू पक्षाकडून एलसीडी, एलईडी, टीव्ही तसेच अद्ययावत तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेले फ्रीज, वॉशिंग मशीन, किचन अपलायन्सेसची मागणी वाढली आहे.’’
- ज्योती चौधरी, पॅनासोनिक, निराला बाजार