आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदाच्या लग्न सराईमध्ये डीजेला तिलांजली, ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद- गेल्याअनेक वर्षांपासून लग्नसराईत सर्वप्रथम बुकिंग डी.जे. या वाद्याचे केले जायचे. मात्र या वर्षी वधू आणि वर पित्यांनीच डी.जे. वाद्याला तिलांजली दिली आहे. ध्वनिप्रदूषणाला आळा बसावा या हेतूने असा निर्णय घेतला गेल्याचे या लग्नसराईत दिसत आहे. फटाक्यांचाही वापर या वेळी कमी झाल्याचे जाणकारांचे मत आहे. रविवारी शहरात पन्नासहून अधिक विवाह लागले. त्यापैकी एकाही लग्नात डी.जे. वाद्य वाजले नाही, हे विशेष.

गेल्या अनेक वर्षांपासून बँडबाजाची जागा डी.जे. या अाधुनिक वाद्याने घेतली होती. एकही लग्न समारंभ डी. जे. शिवाय होत नव्हते. ही प्रथा गेल्या वीस वर्षांपासून होती. ती गेल्या वर्षीपर्यंत अबाधित होती. वर पक्षाचा सर्वात पहिला खर्च म्हणजे डी.जे. चाच होता. यासाठी दहा हजारांपासून ते एक लाख रुपयापर्यंत किंमत मोजावी लागत होती. शासनाच्या जाचक अटीदेखील डी.जे. लावण्याला कारणीभूत असल्या तरी यावर्षी मात्र वधू आणि वर पक्षांनीच डी.जे.पासून फारकत घेतल्याचे चित्र आहे.
लग्न समारंभाला आता सुरुवात झाली आहे. रविवारी (१५ नोव्हेंबर ) शहरातील वेगवेगळ्या भागांत ५० पेक्षा अधिक लग्नं लागले, तेही डी.जे. विनाच. साधे बँड लावण्यातच वऱ्हाडींनी धन्यता मानली. मंगल कार्यालय संघटनांनीही वर पक्षाबरोबरच वधू पक्षांनाही डी.जे. वाजवण्याच्या अटीवर मंगल कार्यालय भाड्याने देणे पसंत केले. शिवाय पोलिस परवानगीच्या अटीही डी.जे. वादकांना परवडणाऱ्या नाहीत. या संपूर्ण बाबींमुळे डी.जे. वाद्य हद्दपार झाल्यात जमा आहे

पोलिसांच्या सूचनांचे पालन
यावेळी पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन केलेच. मात्र वधू पक्ष मंगल कार्यालय भाड्याने घेण्यासाठी आले, तेव्हा डी.जे. लावणार का, असा प्रश्न केला. तेव्हा बहुतांश जणांनी स्वत:हून नकार दिला. या वेळी अनेकांची मानसिकता बदललेली दिसली, असे एका मंगल कार्यालयाच्या मालकाने "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.

असंघटित असल्याने डीजेवर शहरात बंदी
गेल्यापाच वर्षांपासून डी.जे. वादक आणि पोलिसांमध्ये वाद चालू आहे. आम्ही परवानगी नाकारत नाही. मात्र डी.जे. वादकांनी नियम मोडू नये, असा पोलिसांचा आग्रह आहे. डी.जे. चालक संघटित नसल्यामुळे आैरंगाबादसारख्या शहरात डी.जे. ला बंदी आहे. शहरात तीनशेपेक्षा अधिक वाद्य चालक आणि मालक आहेत.

ध्वनिप्रदूषण राेखण्याचा प्रयत्न
माझ्यामुलांचे लग्न झाले आहे. मात्र आम्ही डी.जे. लावला नाही. आमच्या कुटुंबात दोन मतप्रवाह असले तरी मुख्य भूमिका माझी होती. बँडवरच वरात काढली आणि लग्न लावले. यामुळे ध्वनिप्रदूषणही रोखता आले. जास्त गोंधळही माजला नाही. गणपतशिंदे, वरपिता.