आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवारी खड्ड्यांवर विशेष सभा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ३१ आॅगस्टच्या सर्वसाधारण सभेत खड्ड्यांवर चर्चा करण्याऐवजी आयुक्तांना नगरसेवकांनी वेळ घालवल्याबद्दल सर्व स्तरांतून रोष व्यक्त झाला. त्यामुळे आता सप्टेंबर रोजी रस्ते, खड्डे अतिक्रमण या विषयांवर विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. सोमवारपासून गणेशोत्सव सुरू होत असून त्याआधी खड्डे बुजवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी शहरवासीयांची अपेक्षा होती. पण ३१ आॅगस्टच्या सभेत हा विषय नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी चर्चेला येऊच दिला नाही. उलट लाखो रुपयांची कामे सुरू होत नसल्याने आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनाच घेरण्यात त्यांनी सभा गुंडाळली. यामुळे गणरायांचे खड्ड्यातूनच शहरात आगमन होणार असल्याची स्थिती स्पष्ट झाली. ‘दिव्य मराठी’ने तसे वृत्त सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित केले होते. आता राज वानखेडे, गजानन मनगटे, मकरंद कुलकर्णी, कमलाकर जगताप यांनी मागणी करत रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, अतिक्रमण या विषयांवर विशेष सर्वसाधारण सभेमागणी केली होती. त्यानुसार तारखेला ही सर्वसाधारण सभा होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...