Home »Maharashtra »Marathwada »Aurangabad» Weekly Review Of Maharashtra

मागोवा महाराष्‍ट्राचा: राजकारणाचे उलटे वारे, काका आणि पुतण्‍यांमध्‍येच अडकला दुष्‍काळ

दिग्विजय जिरगे | Feb 24, 2013, 06:48 AM IST

पुरोगामी राज्‍य म्‍हणून गणले जाणा-या महाराष्‍ट्रातल्‍या राजकारणाने नवीन प्रथा सुरू केल्‍याचे चित्र मागील काही दिवसांपासून दिसत आहे. काहीही झाले तरी वैयक्‍तीक टीका टाळणा-या जुन्‍या नेत्‍यांच्‍या अगदी उलट सध्‍याच्‍या पिढीच्‍या नेत्‍यांनी सुरू केले आहे. हे नेते दुष्‍काळासारख्‍या गंभीर विषयावर तोडगा काढण्‍याऐवजी एकमेकांविरूद्ध शिवराळ भाषांचा वापर करताना दिसत आहेत. कधी अजित पवार कधी राज ठाकरे तर कधी निलेश राणे तसेच अधून मधून इतर नेत्‍यांचीही त्‍यात भर पडते. मागील आठवडयात हेच दिसून आले. राज ठाकरेंनी अजित पवारांवर अश्‍लाघ्‍य शब्‍दात टीका केली. त्‍याला अजित पवारांनीही त्‍याच शब्‍दात उत्तर देण्‍याचा प्रयत्‍न केला. यांच्‍या भाषणांवर नजर टाकल्‍यास महाराष्‍ट्राचे राजकारण पुढील काळात कोणते वळण घेईल याची प्रचिती येते. तसेच दुष्‍काळातही नेत्‍यांची भपकेबाजी काही कमी झाल्‍याचे दिसले नाही. राष्‍ट्रवादीच्‍या नेत्‍यांनी हायकमांडच्‍या आवाहनाला वाटाण्‍याच्‍या अक्षता दाखवून कुबेरालाही लाजवेल अशा थाटात मुलांची लग्‍ने केली. मागील आठवडयात राज्‍याच्‍या वेगवेगळया ठिकाणी मोठे अपघात झाले. वाहन चालकाच्‍या निष्‍काळजीपणामुळे निरपराध लोकांचा बळी गेला. रस्‍ते कितीही चांगले झाले तरी बेजबाबदार वाहन चालकांमुळे हे अपघात कधी कमी होणार हा मोठा प्रश्‍न आहे.

अशाच काही महाराष्‍ट्रातील घटनांचा आढावा जाणून घेण्‍यासाठी पुढच्‍या स्‍लाईडला क्लिक करा...

Next Article

Recommended