आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उंडणगावात जाळली माथेफिरूने दुचाकी; शहरातील मोर्चा खेड्याकडे वळवला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उंडणगाव - सिल्लोड तालुक्यातील अनाड येथील भैरोबा मंदिर परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास एमएच २० डीके ३३८३ क्रमांकाची मोटारसायकल माथेफिरूने जाळल्याची घटना ताजी असतानाच उंडणगावातही अशीच घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अजिंठा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरात दुचाकी जाळण्याच्या घटना घडत असतानाच आता माथेफिरूंनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. अनाड येथे दुचाकी जाळल्याची घटना बुधवारी उघडकीस आली असतानाच उंडणगावातही दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली. येथील दीपक श्यामराव चौथे यांच्या मालकीची असलेली एमएच २० एपी २९२८ क्रमांकाची दुचाकी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास माथेफिरूंनी जाळली. चौथे यांच्या तक्रारीवरून अजिंठा पोलिस ठाण्यात दुचाकी जाळणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि शंकर शिंदे, कविता शिंदे आदी करत आहेत.