आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weight Of School Bag New Pro Blame In Front Of Children

दप्तराचे ओझे: मुलांची पाठदुखी वाढली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- कोवळ्या वयात र्मयादेपेक्षा जास्त ओझे वाहावे लागत असल्याने शालेय विद्यार्थ्यांमध्ये पाठ, मानदुखीच्या समस्या निर्माण होत आहेत, अशी तक्रार विद्यार्थ्यांसह पालकांनी केली आहे.

स्पर्धेत टिकण्यासाठी शाळांमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणे सुरू झालेली स्पर्धा, त्याचबरोबर आपल्या शाळेतील विद्यार्थी मागे पडू नये म्हणून त्याने कोवळ्या वयात सर्व गोष्टी आत्मसात कराव्यात असा आग्रह असतो. त्यामुळेच पहिल्या वर्गापासून क्रमिक पुस्तकांबरोबरच छंदवर्ग, व्यवसायमाला, गृहपाठ, चित्रकला आदी वह्या आणि पाठय़पुस्तके दप्तरात रोज कोंबली जातात. हेच ओझे पाठीवर घेत मुले शाळेत येतात. शालेय साहित्य शाळेतच ठेवण्याच्या सुविधा मोठय़ा शाळांप्रमाणे लहान शाळांमध्ये नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये पाठदुखी, मानदुखीचा त्रास होत आहे. अशी माहिती ‘दिव्य मराठी’ने बुधवारी केलेल्या सर्वेक्षणात विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांनीही दिली आहे.

‘दिव्य मराठी’ने शहरातील महाराष्ट्र पब्लिक स्कूल, शिवाजी हायस्कूल, वेणुताई चव्हाण, शारदा मंदिर कन्या प्रशाला, विनायकराव पाटील प्राथमिक शाळा येथे जाऊन सव्र्हे केला असता ही बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या वजनाच्या दहा टक्क्यांपर्यंत दप्तराचे ओझे असावे, असा शासनाचा नियम आहे. मात्र मोठय़ा मराठी शाळांबरोबरच आयसीएसई, सीबीएसई शाळांमध्ये वाढत जाणारी विद्यार्थी संख्या पाहून आपल्या शाळेची मान्यता टिकावी या उद्देशाने मोठय़ा शाळांशी होणारी तुलना आणि स्पर्धा छोट्या शाळांना करावी लागत आहे. यामुळे त्यांच्याप्रमाणे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाबरोबरच इतर वाढीव विषय देण्यात येतात. रोज सर्व तासिकांची पाठय़पुस्तके व वह्या शाळेत नेण्यासाठी मोठय़ा दप्तराचा आधार विद्यार्थ्यांना घ्यावा लागतो. परिणामी पाठीवर पडलेला ताण यामुळे मानेवर आणि मणक्यावर त्याचा परिणाम होतो आहे. आई पाठ दुखतेय, मानेला त्रास होतोय, अशा तक्रारी मुले करत असल्याचे पालकांनी सांगितले. रोज शाळेतून आल्यावर थकल्यासारखे होते, हातपाय आणि पाठ दुखते, अशा प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.