आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरुणराजासाेबत अाले गणराज! सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- वरुणराजासाेबत लाडक्या बाप्पाचे शुक्रवारी शहरात जल्लाेषात अागमन झाले. बाप्पा येणार असल्याने सकाळपासून सर्वत्र नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले हाेते. सार्वजनिक मंडळातर्फे काढण्यात अालेल्या मिरवणुकीतील कार्यकर्त्यांचा जाेश वाखणण्याजाेगा हाेता. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्य, लेझीम, पावली खेळत कार्यकर्ते भरपावसात बेधुंद हाेऊन नाचत हाेते. यासाेबत शाळकरी मुलांनी काढलेली मिरवणूकदेखील लक्ष वेधून घेत हाेती. या विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देऊन प्रबाेधन केले. अशा भक्तिमय वातावरणात संध्याकाळपर्यंत नागरिकांनी घराेघरी मुहूर्ताच्या अात गणरायाची स्थापना केली. तर रात्री 9 वाजेपर्यंत सर्वच मंडळांनी स्थापनेचा विधी पूर्ण केला. 

यंदा शहरात लहान-मोठ्या सुमारे पाचशेपेक्षा अधिक मंडळांनी गणपती बसवले अाहेत. बाप्पा येणार म्हणून शहरात सकाळपासून गणेशभक्तांच्या चेहऱ्यांवर आनंद उत्साह जाणवत होता. गणरायाच्या स्थापनेसाठी सार्वजनिक मंडळातर्फे भव्य भरपावसात मिरवणूक काढण्यात अाली हाेती. ढोल-ताशांचा निनाद, डीजेवरील गणेश गीतांवर कार्यकर्ते थिरकत हाेती. मिरवणुकीत यंदा देखील युवतींचा माेठा सहभाग दिसून अाला. महिलांचे ढाेल पथक देखील सहभागी झाले हाेते. प्राथमिक शाळांमधील विद्यार्थांनी लेझीम प्रात्याक्षिके सादर केले. 

बाजारात या वस्तूंना होती अधिक मागणी 
गणरायाच्या प्रसादासाठी तयार मोदक, मिठाई, पेढे, खोबरा कीस, बुंदीच्या लाडूना मोठी मागणी वाढली होती. तसेच पूजेसाठी लागणारे फुलहार, केळीचे खांब, विड्याची पाने, दुर्वा आदी साहित्यांचीही मागणीही दिसून आली. 

वाहनबाजार तेजीत 
श्रीगणेश मुहूर्तावर वाहन खरेदी करण्याची प्रथा अनेक वर्षांपासून अाहे. त्या अनुषंगाने शहरातील दुचाकी चारचाकी दुकानात वाहने खरेदीसाठी ग्राहकांची शुक्रवारी प्रचंड गर्दी झाली हाेती. तसेच इलेक्ट्रॅनिक्स, साेने-चांदीच्या दुकानातदेखील मोठी वर्दळ दिसून अाली. तसेच अापल्या स्वप्नातील घरही अनेकांनी आरक्षित केले, तर कुणी गृहप्रवेश केला. 

यामुळे ठरली मिरवणूक लक्षवेधी 
नवीपेठ गणेश मंडळाचा युवक-युवतींचा सहभाग आकर्षक, शिस्तबद्ध ढोलपथक मिरवणुकीचे आकर्षण ठरले. या वेळी पिंप्राळ्याच्या स्नेह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचला होता. युवाशक्ती फाउंडेशनच्या ढोल पथकानेही विविध प्रात्याक्षिके सादर केली. जुने जळगावातील श्रीराम मंडळाची २० फुटांपेक्षा अधिक उंच मूर्तीही वेगळी ठरत हाेती. 
 
दुपारनंतर पाऊस 
सकाळपासूनसुरू असलेल्या मिरवणुकांमध्ये दुपारी ते ३.३० वाजेदरम्यान पावसामुळे व्यत्यय आणला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत अधून-मधून पाऊस सुरूच हाेता. तरी कार्यकर्त्यांनी गणरायाच्या स्वागताचा जल्लोष कायम ठेवला हाेता. भर पावसात १५ ते २० फुटी उंचीच्या बाप्पाला प्लास्टिकच्या कागदात गुंडाळून मिरवणूक ही शहरातील प्रमुख मार्गावरून नेण्याची कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ दिसून आली. स्थापना मिरवणुकीत फारशी सजावट नसली तरी कार, फियाटसह टेम्पो, ट्रॅक्टर, लोटगाडीसह मिळेल त्या वाहनावर गणरायाची प्रतिमा ठेऊन स्थापना स्थळापर्यंत नेण्याचा उत्साह होता. नवी पेठेतील गुडघाभर पाण्यातून वाट काढताना भक्तांची पंचाईत झाली. 
बातम्या आणखी आहेत...