आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"दिव्य मराठी' स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद, स्वच्छ, सुंदर औरंगाबादसाठी केला संकल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - "दिव्य मराठी'तर्फे हाती घेण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेस युवक, महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ऐतिहासिक वास्तूंमुळे पर्यटननगरी अशी ओळख असलेले औरंगाबाद शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी संकल्प करण्याची तसेच मोहिमेत सहभागी होण्याची तयारीही त्यांनी दाखवली.
औरंगाबादेत बीबी का मकबरा, पाणचक्की, सोनेरी महालासारख्या ऐतिहासिक वास्तू आहेत. त्या पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. मात्र, त्यांना या वास्तूंसोबत कचऱ्याचे दर्शन घडते. ही बाब लक्षात घेऊन "दिव्य मराठी'ने जागरूक, संवेदनशील नागरिकांच्या सहकार्याने शहर स्वच्छता मोहिमेचे शिवधनुष्य पेलण्याचा निर्धार केला. आम्हालाही हे शहर स्वच्छ, सुंदर असावे असे वाटते. त्यामुळे मोहिमेत सहभागी होऊन शहराविषयीची आस्था प्रत्यक्षात आणण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. कचऱ्याची समस्या कशामुळे आहे, ती दूर करण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणाही त्यांनी केली.