आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: आठ पेट्रोल पंप स्थलांतराचे काय झाले? खंडपीठाचा प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील सार्वजनिक ठिकाणांसह वारसास्थळांच्या परिसरातील आठ धोकादायक पेट्रोल पंप शहराबाहेर हलवण्याची विनंती करणाऱ्या याचिकेत जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना शपथपत्र दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि. न्या. के. के. सोनवणे यांनी दिले. पुढील सुनावणी २१ मार्च रोजी होणार. 

सामाजिक कार्यकर्ते शहीद असलम यांनी खंडपीठात दाखल केलेल्या जनहित याचिकेत आठ खासगी पेट्रोल पंपचालक, इंडियन ऑइल, बीपीएल, एचपी आणि रिलायन्स या चार पेट्रोलियम कंपन्या, वक्फ बोर्ड, महापालिका, केंद्र शासन, पुरातत्त्व विभाग, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त आदी ३२ जणांना प्रतिवादी करण्यात आले आहे. कायद्यानुसार, पुरातत्त्वीय संरक्षित स्थळे, शासकीय आणि सार्वजनिक कार्यालये यांच्या शेजारी पेट्रोल पंप असू नयेत. तसेच दोन पंपांमध्ये एक किलोमीटरचे अंतर आवश्यक आहे. असे असताना शहरातील आठ पेट्रोल पंप कायद्याचा भंग करीत असून ते शहराबाहेर हलवण्याची मागणी केली आहे. या पंपांमुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्य वित्तहानीची शक्यता आहे. 
 
खंडपीठाने मनपाला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्तांना पत्र देऊन चौकशी करावी आणि याचिकाकर्त्यांना उत्तर द्यावे, असे कळविले होते. मात्र त्यावर कारवाई झाली नाही. आजच्या सुनावणीत खंडपीठाने पोलिस आयुक्त आणि मनपाला म्हणणे दाखल करण्याचे निर्देश दिले. 
 
१) शहागंज : शहागंज येथील ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीय संरक्षित मशिदीच्या नजीक दोन पेट्रोल पंप आहेत. 
२) जाफर गेट: जाफर गेटच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपामुळे मोठी हानी होण्याची शक्यता आहे. तेथे बाजार असतो आणि दररोज धान्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी असते. 
३) दिल्ली गेट आणि विभागीय आयुक्त कार्यालयाशेजारी असलेल्या पंपामुळे वारसास्थळाच्या यादीत असलेल्या दिल्ली गेटला मोठे नुकसान पोहोचू शकते. शिवाय विभागीय आयुक्तालयाला झळ बसू शकते. 
४) जळगाव रोडवर एकमेकांशेजारी दोन पंप आहेत. दोन पंपांमधील अंतर किमान एक किमी असणे गरजेचे आहे. तसा नियमही आहे. परंतु गरवारे कंपनीसमोरील रिलायन्स आणि एक खासगी पंपामुळे नियमांची पायमल्ली होत आहे. 
५) रेल्वे स्टेशनजवळील मशिदीजवळच्या पंपामुळे रेल्वेस्टेशनही बाधित होऊ शकते. तसेच विभागीय कामगार आयुक्तालयाशेजारी पंप आहे. काही पंपांशेजारी डीपी असून तेथून उच्च दाबाच्या वीज वाहिन्या गेल्या आहेत. 
बातम्या आणखी आहेत...