आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीमुळे किती काळा पैसा बाहेर आला, याचे उत्तर द्यावे भालचंद्र कानगो यांचा केंद्राला सवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद: अदानी अंबानींसारख्या उद्योगपतींचे हित जोपासणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५००, १००० रुपयांच्या नोटा बंद करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले. या निर्णयास ५० दिवस उलटले तरी स्थिती जास्तच बिघडली आहे. या ५० दिवसांत काय मिळवले, किती काळा पैसा बाहेर आला, रांगेत उभे राहून मरणाऱ्यांतील किती जण काळे पैसेवाले आहेत, पैसे काढण्यास निर्बंध का, या प्रश्नांची उत्तरे मोदी सरकारने द्यावी, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉम्रेड भालचंद्र कानगो यांनी मंगळवारी मांडले. 
 
वाळूज येथील समाज मंदिरसमोरील मैदानावर ‘मोदी सरकार, जवाब दो-हिसाब दो’संबंधी रात्री वाजेला आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. लालबावटा शेतमजूर युनियनचे राज्याध्यक्ष अॅड. मनोहर टाकसाळ सभेच्या अध्यक्षस्थानी होते. भाकपचे जिल्हा सचिव प्रा. राम बाहेती यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा सहसचिव अश्पाक सलामी, अॅड. टाकसाळ यांनीही सभेला मार्गदर्शन करून मोदी सरकारच्या नोटाबंदीवर टीका केली. १२ जानेवारी रोजी दुपारी मुंबईतील रिझर्व्ह बँकेवर मोर्चा नेऊन त्यांनाही नोटाबंदीसंदर्भात जाब विचारणार असल्याचे सांगून या आंदोलनात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. 
 
इस्माईल शेख यांनी सूत्रसंचालन केले. पक्षाचे तालुका सचिव मेहबूब कुरेशी, शाखा सचिव इब्राहिम पटेल, वलीमियाँ पीरसाब, शांताराम फांदाडे, चाँद पटेल, बाळासाहेब सरोदे, लतीफ पटेल, बाळासाहेब सरोदे, सुरेश राऊत यांच्यासह शेतकरी, शेतमजूर, कामगार सभेला उपस्थित होते. तालुका सहसचिव गणेश कसबे यांनी आभार मानले. 
 
उद्योग, व्यवसाय ठप्प 
नोटाबंदीनंतर बांधकामे बंद पडल्याने कारागिरांना काम मिळेनासे झाले आहे. शेतकरी, कामगार, शेतमजूर, छोटे व्यापारी हतबल झाले आहेत. व्यवहारात पैसा नसल्याने उद्योग व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यातून मध्यमवर्गीयांवरही उपासमारीची वेळ आली आहे. बँकेतून आपलेच पैसे काढण्यावर बंदी घातली जात असल्याने सर्वसामान्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पैसे काढण्यासाठी बँकांसमोर रांगेत उभे राहणाऱ्या १०० जणांना जीव गमवावा लागला. मात्र, आता काळा पैसा बाहेर काढण्याबाबत खोट्या नोटांबाबत सरकारमधील कोणी काहीही बोलत नाहीत, असा मुद्दाही कानगो यांनी मांडला. 
बातम्या आणखी आहेत...