आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Is It See The Same Thing, Municipal Commissioner Answered To Deputy Mayor

काय पाहायचेय तेच...ते...नेहमीचेच! उपमहापौरांच्या फोनला मनपा आयुक्तांचे उत्तर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - गोमटेश मार्केटमधील औषधी भवनच्या इमारतीने मागील भिंत नाल्याच्या उंचीच्या खाली बांधली आहे. त्यामुळे गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे नाला जाम होऊन हे पाणी नागरिकांच्या घरात घुसले होते. त्याची पाहणी करून उपमहापौर प्रमोद राठोड यांनी आयुक्त डॉ. प्रकाश महाजन यांना फोन केला असता, काय पाहायचे तेच...तेच असे बेजबाबदापणाचे उत्तर दिले.
पावसामुळे शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. सकाळी सातेपासूनच प्रमोद राठोड यांनी विविध भागांत पाहणी केली.
गोमटेश मार्केट परिसरातील घरांमध्ये रात्री गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. पाणी काढण्यासाठी रात्रभर त्या लोकांना कसरत करावी लागली होती. त्याची पाहणी करण्यासाठी उपमहापौर प्रमोद राठोड यांनी सकाळी १२ वा. येथे भेट दिली असता औषधी भवनमागील नाल्यात बायोमेडिकलची घाण साचल्याचे दिसून आले. तसेच त्यात डुकरे आणि इतर घाण असल्याचे भयंकर दृश्यही समोर आले. औषधी भवनच्या पाठीमागे बांधण्यात आलेली भिंत जास्त खोलवर बांधल्याने घाण साचून पाणी अडवल्याचे दिसून आले. जास्तीचे बांधकाम साचलेल्या घाणीमुळे नागरिकांना झालेला त्रास याची पाहणी करत असताना राठोड यांनी महाजन यांना फोन केला.

भाजपच्या कार्यालयात पाणी
उस्मानपुऱ्यातीलभाजपच्या कार्यालयात पाणी साचले होते. हे पदाधिकाऱ्यांनी अग्निशमन कार्यालयाला कळवल. मात्र, सगळ्या गाड्या बचावकार्यात व्यग्र असल्याने सायं. पर्यंतही हे पाणी काढण्यात आले नव्हते. कार्यालयातील संगणक इलेक्ट्रॉनिक उपकरणे हटवण्यासही अडचण झाली होती.