आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग भोवली; रेल्वेच्या धडकेत जजचा मुलगा ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंगच्या नादात समोरून येणार्‍या रेल्वेगाडीकडे लक्ष न गेल्याने सुमीर मोहंमद रियाजोद्दीनचा (18) धडक लागून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी संग्रामनगर उड्डाणपुलाखालील रेल्वे रुळाजवळ घडली. सुमीर हा वक्फ बोर्डाचे न्यायाधीश मोहंमद रियाजोद्दीन यांचा मुलगा होता.

सुमीर हा मित्रासोबत संग्रामनगर उड्डाणपूल रेल्वेपटरीजवळ गेला होता. काळी वेळेनंतर त्याने व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करण्यास सुरुवात केली. या नादात तो रुळाच्या अगदी जवळून चालत होता. तितक्यात समोरून येणार्‍या रेल्वेगाडीने त्याला धडक दिली. रात्री 11 च्या सुमारास घाटीत उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.