आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष : व्हॉट्सअॅपवर कॉलिंग, पण डेटा पॅकला चाट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/नाशिक - ज्याची नेटिझन्स आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस अखेर मंगळवारी उजाडला.. अन् व्हॉट्सअॅपवर दणाणून कॉल्स सुरू झाले. तर, काहींच्या चॅट विंडो स्प्लिट झाल्या.. व्हॉट्सअॅप चॅट बॉक्समध्ये तीन पर्याय दिसू लागले आणि मोफत कॉलिंगची सर्वत्र धूम सुरू झाली.
व्हॉट्सअॅपच्या २.११.४७ नंतरच्या सगळ्या व्हर्जन्ससाठी कॉलिंग सुरू झाले. त्यासाठी अपडेटेड व्हॉट्सअॅप व इंटरनेट कनेक्शनची गरज आहे. आधी निवडक, मग सर्व मोबाइलवर ही सुविधा सुरू झाली आहे. मात्र यामुळे डेटा पॅकला चांगलीच चाट बसेल.
असे करा अपडेट

प्ले स्टोअरवर व्हॉट्सअॅपचे २.१२.५ हे व्हर्जन दिसते. ते डाऊनलोड केल्यास कॉलिंग सुरू होईल. व्हॉट्सअॅपच्या अधिकृत साइटवर तुम्हाला २.१२.१६ हे व्हर्जन मिळणार आहे. दोन्ही व्हर्जनची एम.बी. स्पेस ही एकसारखीच असल्याने व्हॉट्सअॅप साइटवरून नवीन व्हर्जन डाऊनलोड केल्यास उत्तम.
असा करा कॉल : मोबाइलमध्ये असलेली चॅट विंडो बदलल्याचे तुमच्या लक्षात येईल. या विंडोत ३ पर्याय दिसतील. त्यापैकी पहिला कॉल, दुसरा चॅट व तिसरा कॉन्टॅक्ट्स असेल. यापैकी कोणत्याही पर्यायाचा वापर करून कॉल करता येतो.व्हॉट्सअॅप कॉल हा इंटरनेटद्वारे व्हीओआयपी तंत्रज्ञानाने करता येतो. म्हणजेच या कॉलसाठी मेन बॅलन्स नव्हे तर नेट पॅकमधील डाटा खर्च होईल.