आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्स‌अॅपवरही होतेय कवितेची समीक्षा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- सद्य:स्थितीत व्हॉट्सअॅप म्हणजे उथळ चर्चा, आलेले मेसेज साभार फॉर्वर्ड करणे, अश्लील फोटोज्-व्हिडिओ पाठवण्याचे माध्यम बनले अाहे. तरुणाईकडून त्याचा केवळ ‘टाइमपास’साठी वापर केला जातो. मात्र, या सोशल माध्यमाचा विधायक वापर केल्यानंतर सर्जनशील काम नक्कीच होऊ शकते, याचा आदर्श वस्तुपाठ खान्देशातील कवींनी निर्माण केला आहे.
कवी प्रा.नामदेव कोळी यांनी व्हॉट्सअॅपवर ‘खान्देश साहित्य मंच’ नावाचा ग्रुप तयार केला असून, या ग्रुपवर साहित्यिकांचा मेळाच भरलेला आहे. या ग्रुपवर उथळ चर्चा, वात्रट विनोद, अश्लीलतेला थारा नाही; तर होते ती फक्त साहित्य चर्चाच. ग्रुपवर साहित्यिक व्यक्त होत आहेत. सध्या काय चाललेय, काय लिहिताहेत, साहित्य क्षेत्रातील घडामोडी, यावरच ग्रुपमध्ये चर्चा होते. या ग्रुपमध्ये नामांकित कवींबरोबरच नवोदितांचाही समावेश आहे.

समीक्षेचाही वेगळा प्रांत
ग्रुपवरकवींनी पोस्ट केलेल्या कवितांना दाद देण्याबरोबरच कवितेची समीक्षाही होताना दिसते. घडलेल्या बिघडलेल्या कवितांची नोंद घेत टिप्पणी केली जाते. अनेक जण स्वत:च्या निर्मितीच्या प्रेमात पडतात. मात्र, असे स्वत:च्या निर्मितीच्या प्रेमात पडणाऱ्या माणसांकडून चांगले लिखाण होऊ शकत नाही, त्यासाठी समीक्षाही हवीच.

साहित्याबाबतही चर्चा
नवीनप्रकाशित झालेले पुस्तक, आगामी येणारे पुस्तक, साहित्यसंमेलने, शहरात होणारे साहित्यविषयक उपक्रम, याबाबत ग्रुपवर चर्चा रंगत असते. कथा, कादंबरी, कविता आदी साहित्य प्रकारात मिळालेले पुरस्कार, याबाबतही शेअरिंग केले जाते.

कोणसाहित्यिक ग्रुपमध्ये?
अशोककोतवाल, अशोक कौतिक कोळी, शशिकांत हिंगोणेकर, आबा महाजन, प्रा.सत्यजित साळवे, प्रा.बी.एन.चौधरी, गोकुळ बागुल, माया धुप्पड, शंभू पाटील, जिजाबराव वाघ, मंदाकिनी पाटील आदी साहित्यिकांबरोबर नवोदितांचाही या ग्रुपमध्ये समावेश आहे.

नवकवींना मिळतेय प्रोत्साहन
याग्रुपवर असलेले नवकवी हे त्यांनी अलिकडेच केलेल्या कविता पोस्ट करतात. त्यानंतर क्षणार्धात सुरू होते साहित्याची कार्यशाळा. कवितेच्या शिर्षकापासून यमक, लयबद्धता, मांडणी, आशय याविषयी नवकवींना ग्रुपमधून मार्गदर्शन केले जात आहे.
साहित्यिकांचा मेळा