आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन गहू बाजारात, वर्षभराच्या धान्य खरेदीला वेग; भाव स्थिर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रब्बीतील नवीन गहू बाजारात दाखल झाला असून जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समतिीत गत आठ दविसांत महाराष्ट्रासह परराज्यातून २० हजार क्विंटल गव्हाची आवक झाली आहे. मागणी आणि पुरवठ्यात समतोल होऊन भाव स्थिर राहण्यास मदत मिळाली आहे. त्याचा लाखो ग्राहकांना फायदा होत आहे.
दुष्काळात पाण्याचा काटकसरीने वापर, अवकाळी पाऊस, गारपीट अशा संकटातही औरंगाबाद, जालना बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ८० हजार ५२५ हेक्टरवर गव्हाचे उत्पादन घेतले आहे. दुष्काळी स्थिती कौटुंबिक अडचणी, मुलींचे लग्न, शैक्षणिक खर्च अशा स्थितीत कर्ज घेऊन बळीराजाने वर्षभराचे नियोजन करत गव्हाबरोबरच इतरही धान्य विक्रीसाठी बाजारात आणणे सुरू केले आहे. परराज्यातूनही दररोज १५ ते २० ट्रक गहू विक्रीसाठी येत आहे. या संधीचा फायदा घेण्यासाठी कामगार, कष्टकरी, नोकरदार ग्राहक सरसावले असून बाजारात धान्य खरेदीला वेग आला आहे.


ग्राहकांनीकाळजी घ्यावी :
राज्यासहमध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आदी राज्यांत अवकाळी पावसामुळे गव्हाचा रंग आणि पोषकतेवरही काही प्रमाणात परिणाम झाला आहे. काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक संकटातून गहू पीक वाचवून लवकर काढणी केली आहे. यामुळे गहू ओला असण्याची शक्यता आहे. तेव्हा वर्षभराचे नियोजन करताना गहू खरेदीनंतर दोन ते चार दविस कडक उन्हात गहू वाळू घालावा. त्यानंतर कोठीत, गोणीत भरून ठेवावा. अन्यथा गव्हाला कीड, बुरशी लागण्याची दाट शक्यता आहे.

आवक असल्याने भाव स्थिर
गुजरात,मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रतून गव्हाची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आहे. गत आठ दविसांत २० हजार क्विंटल गहू विक्रीसाठी दाखल झाला असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. मागणीच्या तुलनेत आवक असल्याने भाव स्थिर आहेत. जगदीशभंडारी, गहू विक्रेता. जाधववाडी.

दररोज पंधरा ते वीस ट्रक
आंध्र,मध्य प्रदेश आणि गुजरातमधून दररोज पंधरा ते वीस ट्रक गव्हाचे भरून येत आहेत. एका गाडीत १८ टन गहू असतो. आवक चांगली होत असून खरेदीला वेग आला आहे, पण दोन दविसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचा बाजारपेठेवर मोठा परिणाम झाला आहे. नानासाहेबआधाने, सचवि, जिकृउबास. जाधववाडी.

एप्रिलमध्येच खरेदी का?
रब्बीतीलशेतमाल काढणीनंतर शेतकरी आर्थिक निकड, साठवणुकीची व्यवस्था नसल्याने बाजारात विक्रीसाठी आणतात. मागणी आवक दोन्ही बरोबर असल्याने किफायतशीर दराने वर्षभराचे धान्य खरेदी करणे कामगारांना, कष्टकरी नोकरदारांना शक्य होते. त्यामुळे एप्रिलमध्ये धान्य खरेदीला वेग येतो. सध्या २० हजार क्विंटलची आवक झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फोटो -शहरातील एका किराणा दुकानात धान्य खरेदी करताना महिला. छाया : दिव्य मराठी
पुढील स्लाईडवर, गव्हाच्या बाजाराचे गणीत