आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिसगाव चौकात वळण घेणाऱ्या ट्रकने ठोकरले; दुचाकीस्वार ठार, दोघे जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - तिसगाव-लिंकरोडचौकात वळण घेणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक बसली. यात दुचाकीवरील तिघांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एक गंभीर जखमी, तर तिसरा किरकोळ जखमी झाला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास झाला. सुमीत सुभाष पवार (२३, रा. होनाजीनगर, जटवाडा रोड औरंगाबाद) असे मृताचे, तर रवी शेषराव मोरे (१८) पंकज दिलसिंग कहाटे (२५) अशी जखमींची नावे आहेत. रवी मोरे हा गंभीर जखमी झाला असून पंकजची प्रकृती चांगली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
 
होनाजीनगर औरंगाबाद येथील तिघे मित्र शुक्रवारी सायंकाळी वाजेच्या सुमारास दुचाकीने (एमएच २० सीएक्स २४०७) गंगापूरच्या दिशेने ट्रिपल सीट निघाले होते. रवी मोरे हा दुचाकी चालवत होता. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तिसगाव-लिंकरोड चौकामध्ये त्यांची दुचाकी पुढे जात असताना वाळूज एमआयडीसीतून जालन्याच्या दिशेने वळण घेणाऱ्या ट्रकची (एमएच २१ एक्स ५८७७) त्यांच्या दुचाकीला धडक बसली. तिघेही पडून जखमी झाले. त्यात रवी सुमीत हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना घाटीत दाखल केले. उपचारादरम्यान पहाटे सुमीतचा मृत्यू झाला. गंभीर जखमी रवीवर उपचार सुरू आहेत. पंकज कहाटेच्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. सतीश जोगस करीत आहेत. 

लिंकरोड चौकातील पुलाच्या मागणीकडे दुर्लक्ष : या चौकामध्ये अनेकांचे प्राण गेले आहेत. नेहमीच रात्रीच्या वेळी तसेच पहाटे या चौकामध्ये अपघात होतात. पंधरा दिवसांपूर्वीच या चौकामध्ये स्कूटीस्वार पती-पत्नीला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली होती. अनेक महिन्यांपासून या चौकात उड्डाणपूल उभारण्याची मागणी होत आहे. मात्र, प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.  
बातम्या आणखी आहेत...