आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमेरामन निघताच आंदोलन गुंडाळले, १५ मिनिटे आंदोलन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शेतकऱ्यांनापूर्ण कर्जमाफी देण्याबरोबरच इंधनाचे दर कमी करावेत, या मागणीसाठी काँग्रेसकडून २१ जानेवारीपासून राज्यभरात आंदोलन सुरू करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी २२ जानेवारी रोजी शहर काँग्रेसच्या वतीने विभागीय आयुक्तालयासमोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनासाठी काँग्रेसचे मोजून ६५ कार्यकर्ते उपस्थित होते. छायाचित्रकार निघाल्यानंतर आंदोलकही निघून गेले. मोजून १५ मिनिटे निदर्शने करण्यात आली.

शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काँग्रेस आंदोलन करणार असल्याची घोषणा करण्यासाठी प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत २० जानेवारीला शहरात आले होते. ही माहिती देण्यासाठी त्यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेला ५० च्या आसपास कार्यकर्ते उपस्थित होते. त्यापेक्षा १५ जास्तीचे कार्यकर्ते आंदोलनाला आले. यात पाच महिला कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

तीनच नगरसेवकांनी लावली हजेरी
महानगरपालिकेतकाँग्रेसचे २० सदस्य आहेत. त्यातच पालिका निवडणूक अवघ्या दोनच महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे किमान नगरसेवक तसेच इच्छुकांची या आंदोलनाला गर्दी राहील, असे अपेक्षित होते; परंतु यातील असद पटेल, डॉ. जफर खान आणि खलील खान या तिघा नगरसेवकांनीच हजेरी लावली. डॉ. खान असद पटेल अगदी शेवटच्या घोषणेला हजर झाले.