आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण म्हणतो भारत असहिष्णू ?, शारजाहच्या अधिका-याचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कोण म्हणतो भारतात असहिष्णुता वाढली आहे? असा सवाल शारजाहच्या वाणिज्य मंत्रालयाचे उपसंचालक रईद अल बुखातीर यांनी केला. कुणी भारतातील वातावरणाबद्दल तसे म्हणतच असेल तर तो शुद्ध राजकारणाचा भाग आहे आणि प्रसारमाध्यमांपुरताच मर्यादित आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शारजाह येथील प्रख्यात सैफ झोनमध्ये (आंतरराष्ट्रीय िवमानतळ) व्यवसाय, उद्योग व्यवसायासाठी औरंगाबादेतील उद्योजकांना निमंत्रित करण्यासाठी ते येथे आले आहेत. त्यावेळी ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी त्यांची निरीक्षणे नोंदवली. गेल्या काही महिन्यांपासून भारतात असहिष्णुता वाढल्याचे म्हटले जात आहे. त्याबद्दल तुमचा काय अनुभव आहे, या प्रश्नावर बुखातीर स्मित हास्य करत म्हणाले की, मी २० वर्षांपासून भारतात येत आहे. अनेक शहरांत भटकलो. लोकांना भेटलो. गेल्या वर्षभरातही दोन-तीन वेळा येणे झाले. मला कुठेही असहिष्णुता जाणवली नाही. उलट लोक अतिशय प्रेमाने बोलतात. हिंदू-मुस्लिम असा भेदभाव कुठेच आढळत नाही. उलट माझा अरबी पायघोळाचा वेश पाहून लोक आनंद व्यक्त करतात. तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो. ते पाहून मला अधिक सुरक्षित वाटते. अशाच वेशात युरोपात गेलो तर धार्मिक द्वेषाचा, अहिष्णुतेचा सामना मला करावा लागेल, अशी टिपणीही त्यांनी केली.