आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नऊ हजारांची लाच घेताना अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा सामान्य रुग्णालयातील कार्यक्रम समन्वयक शिवाजी मच्छिंद्र पाचोडे याला सोमवारी दुपारी हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. एका परिचारिकेला पुनर्नियुक्तीचे आदेश देण्यासाठी त्याने लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात परिचारिका या पदावर कंत्राटी पद्धतीने काम करते. कंत्राटाचा कालावधी वाढवून घेण्यासाठी परिचारिकेने १० जानेवारी २०१५ रोजी अर्ज केला. यासाठी पाचोडे याने हजार रुपयांची मागणी केली. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तिने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. पैसे देण्यासाठी पाचोडे याने परिचारिकेला सोमवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात बोलावले. त्या ठिकाणी एसीबीच्या पथकाने सापळा लावून नऊ हजारांची लाच घेताना त्यास रंगेहाथ पकडले.
सामान्य रुग्णालयातील शिवाजी पाचोडेवर गुन्हा
पोलिसअधीक्षक डॉ. डी.एस स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, विवेक सराफ, निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी सापळ्याचे नियोजन केले. अश्वलिंग होनराव, सचिन शिंदे, नितीश घोडके, अमोल वडगावकर, मीरा सांगळे, नितीन गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. सिटी चौक पोलिस ठाण्यात पाचोडेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.