आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर पांढऱ्या वाघिणीचा मृत्यू, पाच दिवसांपासून होती सलाइनवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील दोन पांढऱ्या वाघांपैकी वृद्ध झालेल्या राणीचा (वय २२) शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेदरम्यान मृत्यू झाला. काही दिवसांपासून तिचा आहार कमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. पाच दिवसांपासून ती सलाइनवरच होती अशी माहिती सूत्रांनी दिली. ओरिसातील कानन नंदन येथून सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयात प्रमोद भानुप्रिया जोडी आणली होती. त्यांच्यापासून जन्मलेल्या पांढऱ्या बछड्यांची संख्या झाली होती. प्राणिसंग्रहालयातील कमी जागा आणि सुविधा लक्षात घेऊन काही पांढऱ्या वाघांना इतर प्राणिसंग्रहालयात हलवण्यात आले होते. त्यामुळे प्राणिसंग्रहालयात तीनच वाघ शिल्लक होते. त्यापैकी गीताचा जूनमध्ये वृद्धापकाळाने मृत्यू झाला. तिच्यानंतर दोनच वाघ शिल्लक होते, यातूनही राणीचा मृत्यू झाल्याने एकच पांढरा वाघ शिल्लक आहे. राणीचे पोस्टमार्टम वन विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होऊन नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...