आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निव्वळ धूळफेक, रस्त्यांची दुरावस्ता...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहर खड्ड्यात गेल्याने ओरड झाली आणि काही रस्त्यांचे व्हाइट टॉपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला; पण त्यातही जनतेचा पैसा कसा मातीत घातला जात आहे हे डीबी स्टारने दोन दिवसांत मांडले. तशीच अवस्था लिटिल फ्लॉवर ते भावसिंगपुरा रस्त्याची झाली आहे. वर्षभरापूर्वी याच रस्त्याचे निकृष्ट डांबरीकरण करणाऱ्या ठेकेदारालाच जणू ‘बक्षीस’ म्हणून या रस्त्याच्या व्हाइट टॉपिंगचे काम देण्यात आले. त्याने एकतर अर्धवट काम केले. जे केले त्याचेही सहाच महिन्यांत वाटोळे झाले आहे. सारे मिळून संपूर्ण शहरात निव्वळ धूळफेक करत असल्याचे डीबी स्टारच्या तपासातून पुढे आले आहे.
शहरातील सर्वच रस्त्यांबाबत तत्कालीन मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी विशेष बैठक घेतली होती. स्ट्रॉम वॉटरसाठी वेगळी व्यवस्था नसल्याने, पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून जागोजागी डबकी निर्माण होतात. त्यात बहुतांश रस्ते डांबरीच असल्याने टायरच्या न्यूमॅटिक अॅक्शनमुळे ते खराब होतात.

म्हणून घेतला निर्णय
डांबरी रस्त्याच्या कामाचा सदोष दायित्व निवारण कालावधी (डीएलपी) वर्षांचा असतो, तर व्हाइट टॉपिंगच्या कामाचा सदाेष दायित्व निवारण कालावधी पाच वर्षांचा असतो. हे रस्ते कमीत कमी १० वर्षे उत्तम स्थितीत राहू शकतात. ३० वर्षे टिकल्याचा गाजावाजाही करता येतो. व्हाइट टॉपिंग रस्ते केल्यास पुढील दोन ते तीन वेळेची देखभाल दुरुस्ती वाचू शकते. कारण डांबर कामात दर तीन वर्षांनी रिन्युअल कोट देणे जरुरीचे असते. नागरिकांना पुढील १० वर्षे उत्तम रस्त्यांचा वापर करता यावा म्हणून तत्कालीन मनपा आयुक्तांनी शहरातील काही प्रमुख रस्ते व्हाइट टॉपिंगमध्ये करण्याचे आदेश दिले होते. यासाठी डांबरकामाच्या निविदा रद्द करून डांबर कामाचे अंदाजपत्रक हे व्हाइट टॉपिंगच्या कामात बदलण्यासाठी मान्यताही देण्यात आली. त्यात वाॅर्ड अंतर्गत येणाऱ्या लिटिल फ्लॉवर स्कूल ते भावसिंगपुरा या रस्त्याचाही समावेश होता.

पावणेतीन कोटींचा रस्ता
या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वॉर्ड कार्यकारी अभियंता कार्यालयाने या रस्त्याचे जुने डांबरीकरणाचे कोटी लाख ७९ हजार ४७४ रुपयांचे अंदाजपत्रक रद्द केेले. त्यात ६९ लाख ९५ हजार २१६ रुपयाची भर घालून या कामासाठी तब्बल कोटी ७६ लाख ७४ हजार ६९० रुपयांच्या व्हाइट टाॅपिंग कामासाठी अंदाजपत्रक तयार केले.

नोटिसांचा सोपस्कार
काम रखडल्याने वाॅर्ड च्या कार्यकारी अभियंता कार्यालयामार्फत ठेकेदाराला नोटिसा बजावण्याचा सोपस्कार पार पाडण्यात आला. त्यावर बिल थकल्याने काम अर्धवट सोडल्याचा आरोप ठेकेदाराने केला आहेे.

दुरुस्ती करून देऊ
^मी सब ठेकेदार म्हणून मी काम करतोय. अजून या रस्त्याचे ४० टक्केही काम पूर्ण झालेले नाही. झालेल्या कामाचा मोबदलाही अद्याप मिळाला नाही. त्यामुळे काम थांबलेले आहे. काम सुरू करू त्या वेळी ज्या ठिकाणी क्रॅक असतील ते पुन्हा दुरुस्त केले जातील. ख्वाजाआमिनोद्दीन, मस्कटकन्स्ट्रक्शन

मागचीच बिले थकली आहेत
^मनपाने देयके दिल्यामुळे आम्ही हे काम केले नव्हते. सब ठेकेदार नेमता येतो. याबाबत मी अधिक सांगू शकत नाही. मागच्या वर्षाची बिले या वर्षी मिळाली आहेत. मस्कटकडून ७०० मीटरचे काम झाले. त्यातील डॅमेज झालेला भाग दुरुस्तीदरम्यान पूर्ण करून घेणार. ऋषिकेशवाघमारे, अभियंता,जे.पी.एंटरप्रायजेस
"त्याच' ठेकेदाराने केले काम
या अंदाजपत्रकाला २३ जानेवारी २०१४ रोजी तत्कालीन मनपा आयुक्तांनी प्रशासकीय तांत्रिक मान्यता दिली. त्यानुसार बी-१ निविदेअंतर्गत मार्च २०१४ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला. सदर रस्ता दुरुस्तीचे काम जे. पी. एंटरप्रायजेस यांना देण्यात आले होते. त्यांनी या कामाचा उप ठेका औरंगाबादच्या मस्कट कन्स्ट्रक्शनला दिला. मस्कट कन्स्ट्रक्शनचे ख्वाजा आमिनोद्दीन यांनी दोन महिने कसेबसे ४० टक्के काम केले. त्याला सहा महिन्यांतच तडे गेले आहेत. दुसरी बाब म्हणजे दोन्ही बाजूंच्या कडा निखळत आहेत. उर्वरित ६० टक्के रस्त्याचे कामही वर्षभरापासून रखडले आहे. एकतर अर्धवट रस्ता आणि तोही पूर्वीपेक्षाही भयंकर झाला आहे.