आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेच का तुमचे ३० वर्षे टिकणारे रस्ते?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लाँग लाइफटिकणारे रस्ते, असा प्रचार करून शहरात व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांचा शुभारंभ झाला. सिमेंटचे रस्ते किमान तीस वर्षे टिकतात, मात्र सिमेंटीकरणच सदोष असेल तर खरेच तीस वर्षे हे रस्ते टिकतील का, हा प्रश्न निर्माण होतो. काम सुरू असतानाच रस्ते आरपार क्रॅक झाले अाहेत. शिवाय कामात तांत्रिकदृष्ट्या अनेक चुका आहेत. यासंदर्भात डीबी स्टारने जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातील (जेएनईसी) सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापकांच्या मदतीने टेक्निकल ऑडिट केले. याअंतर्गत या टीमने पहिल्या टप्प्यात सेव्हन हिल्स ते सूतगिरणी चौक, कासलीवाल कॉर्नर ते तुकोबानगर, गजानन महाराज मंदिर ते जय भवानीनगर चौक, कामगार चौक ते महालक्ष्मी चौक या चार रस्त्यांची पाहणी केली. त्याचा हा स्पेशल रिपोर्ट.
या चारही रस्त्यांचे अंदाजपत्रक २० कोटी ८९ लाख ९२ हजार ७९४ एवढे आहे. मे. जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला मूळ अंदाजपत्रकापेक्षा आठ टक्के अधिक दराने या रस्त्यांच्या कामाचा ठेका मिळाला. सप्टेंबर २०१५ रोजी या कामांची वर्क ऑर्डर निघाली, मात्र कामात दोष असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

नागरिकांच्या तक्रारी
व्हॉईटटॉपिंगच्या रस्त्यांचे शोल्डर (पंखे) भरलेले नसल्याने रस्त्याखाली वाहन नेता येत नाही. वाहनाला गती दिली की ते जंप होत चालते. काही ठिकाणी रस्ते क्रॅक झाले, अशा तक्रारी नागरिकांनी मांडल्या होत्या. चमुनेे तज्ज्ञांसोबत रस्त्यांची तांत्रिकदृष्ट्या तपासणी केली. पहिल्या टप्प्यात सेव्हन हिल ते सूतगिरणी चौक, गजानन महाराज मंदिर ते जय भवानीनगर चौक, कासलीवाल कॉर्नर ते तुकोबानगर, कामगार चौक ते महालक्ष्मी चौक या चार रस्त्यांची यात निवड केली आहे.

रायडिंग क्वालिटी कमी
डांबरी रस्त्यापेक्षा सिमेेंट रस्त्याची रायडिंग क्वालिटी कमीच असते. मात्र, शहरात सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांची रायडिंग क्वालिटी वाजवीपेक्षाही कमी आहे. जॉइंटच्या ठिकाणी फिनिशिंग दिल्याने पूर्ण रस्ते चढउताराचेच बनले आहेत. यामुळे चालवताना अनेक गतिरोधक जाणवतात.

विरुद्ध दिशेला स्लोप
कासलीवाल कॉर्नर ते महालक्ष्मी चौक या रस्त्यालगत पेव्हर ब्लॉक बसवले आहेत. रस्त्यावर पाणी साचून राहू नये म्हणून, रस्त्याच्या कडेकडे स्लोप काढावा लागतो. मात्र पेव्हर आणि रस्त्याचा स्लोप सदोष असल्याने नाली तयार झाली आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचते.

जागोजागी हॉनिकाँब
टीमने रस्त्यांची बारकाईने पाहणी केली. यात रस्त्याच्या आतमध्ये जागोजागी मोकळी भगदाडे (हॉनिकाँब) दिसली. सिमेंट ठासून भरल्यास ते एकजीव होत नाही. त्यामुळे असे हॉनिकाँब तयार होतात, असे टीमने सांगितले. हनिकाँब तयार झाल्यास रस्ता लवकर फुटतो.

रस्त्यांचा महत्त्वाचा भाग असतो शोल्डर. सिमेंटीकरणानंतर बाजूला राहिलेल्या जागेवर पक्का मुरूम टाकून त्यावर पेव्हिंग ब्लॉक करावा लागतो. रस्त्याला क्रॅक जाऊ नये, यासाठी या शोल्डरचा मोठा आधार असतो. शिवाय रस्त्याच्या खाली वाहने उतरवण्यासाठी स्लोपही तयार हाेतो. मात्र, काही रस्त्यांचे शोल्डर फीलिंग झाले नाही. सिमेंटीकरणाचा टप्पा झाल्यावर लगेच तो वाहतुकीसाठी खुला होत आहे. त्यामुळे अपघाताची भीती आणि रस्त्यांचे नुकसान वाढले आहे.

ज्या ठिकाणाहून पाइपलाइन, ड्रेनेजलाइन, कम्युनिकेशन केबल्स गेलेल्या अाहेत, तिथे पक्के सिमेंटीकरण करण्याऐवजी पेव्हर ब्लॉक बसवले आहेत. पेव्हर ब्लॉक बसवताना मूळ रस्त्यापेक्षा दीड ते दोन इंच उंचीवर बसवले अाहेत. त्यामुळे हे पेव्हर ब्लॉक म्हणजे एक प्रकारचे गतिरोधकच झालेत. शिवाय ते आताच फुटलेत.

रस्ते दर्जेदारच होतील
^तुम्ही सांगितलेल्या सर्व बाबींची मी पाहणी करणार आहे. त्यानंतरच यावर भाष्य करणे योग्य ठरेल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत रस्त्यांच्या दर्जाबाबत तडजोड होऊ दिली जाणार नाही. आम्हीदेखील थर्ड पार्टी ऑडिट केले आहे. सुनीलकेंद्रेकर, मनपाआयुक्त

रस्ता आरपार क्रॅक
गजाननमहाराज मंदिर ते जय भवानीनगर चौक या रस्त्यावर पाण्याच्या टाकीसमोर रस्ता दोन ठिकाणी आरपार क्रॅक झालेला अाहे. पुढे रस्त्याचे काम सुरू आणि मागे क्रॅक झाला. काँक्रिटिंग क्वालिटी आणि रस्त्याचा बेस गुणवत्तापूर्ण नसल्याने रस्त्याला असा आरपार क्रॅक जातो, असे टीमने स्पष्ट केले. अखिलेश सिंग, इंजिनिअर,जीएनआय इन्फ्रा. प्रा. लि. (कंत्राटदार)
सखाराम पानझडे, शहरअभियंता