आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • White Topping Three Months Road Partially Explained

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हाइट टॉपिंग रस्त्याचे अर्धवट काम तीन महिन्यांपासून रखडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हिमायतबागेकडून हडको टीव्ही सेंटर चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे चौक रस्त्याचे काम मंजूर झाले. प्रत्यक्षात कामाला वर्षभरापूर्वी सुरुवात झाली. मात्र, गोदावरी हायस्कूल ते अण्णाभाऊ साठे चौक रस्त्यावरचे काम मागील तीन महिन्यांपासून अर्धवट सोडण्यात आले आहे. यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे.
सिडको-हडकोकडे कमी वेळेत येण्यासाठी हिमायतबाग ते अण्णाभाऊ साठे चौकमार्गे जाणारे हजारो वाहनधारक आहेत. या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांची तारांबळ उडत होती. महानगरपालिकेने या रस्त्याचे काम व्हाइट टॉपिंगमध्ये घेतले. मुंबईच्या जेपी इंटरप्रायजेस कंपनीला काम सोपवण्यात आले. २०१४ मध्ये रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. व्हॉइट टॉपिंग रस्त्याचे काम गोदावरी हायस्कूलपर्यंत करण्यात आले. मात्र, पुढील रस्त्यावर ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम शिल्लक होते. यामुळे काही कालावधीसाठी काम थांबवण्यात आले. त्यानंतर ड्रेनेजलाइनचे काम पूर्ण होऊन तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्यापही अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्यात आलेले नाही. रस्ता तत्काळ करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
हिमायतबागेकडून हडको टीव्ही सेंटर चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर खड्डे पडले आहेत. इन्सेट : एका बाजूने वाहतूक सुरू असल्याने वाहनांची कोंडी होत आहे.

रस्त्याचे काम सुरू करू
^सध्यासिमेंट काँक्रिटीकरणासाठी खडी मिळत नाही, क्रशरवर बंदी घालण्यात आलेली अाहे. शहरातील अनेक रस्त्यांचे काम बंद करण्यात आलेले आहे. बंदी उठल्यास या रस्त्याचे उर्वरित काम लवकरच केले जाईल. अफसरसिद्दिकी, कार्यकारी अभियंता

दोन महिन्यांपूर्वी ड्रेनेजलाइनचे काम पूर्ण झाले असतानाही रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले नाही. वॉर्डातील समस्यांकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. विकाससोनगिरे, रहिवासी

काम अर्धवट सोडल्यामुळे एका बाजूने रस्ता चालू आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. शाळा सुटल्यानंतर मुलांना जाण्यासाठी-येण्यासाठी त्रास होत आहेे. सांडूपुसे, रहिवासी

मौलाना आझाद कॉलेज, गोदावरी हायस्कूल दवाखाने या या भागात आहेत. रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचते. येण्या-जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही. सचिनगायकवाड, रहिवासी

पंधरा- वीस हजार नागरिक येथे राहतात. वर्दळीचा रस्ता असताना अर्धवट सोडवण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्रास होत आहे. विवेककानडखेडकर, रहिवासी

रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडलेले असल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिका याकडे लक्ष देत नाही. आनंदकांबळे, रहिवासी
दिव्य मराठी हेल्पलाइन
तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमच्या प्रतिनिधींना ९७६५०७०३३३, ९०२८०४५१९९ या मोबाइल क्रमांकांवर समस्या कळवा.