आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हाइट टॉपिंग कामाच्या मंदगतीवर पदाधिकारी नाराज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापौर, स्थायी समिती सभापती व सभागृहनेत्यांनी शहरात सुरू असलेल्या व्हाइट टॉपिंगच्या कामांची पाहणी केली. कामाच्या वेगाबाबत स्पष्ट नाराजी व्यक्त करीत त्यांनी पावसाळ्यात पाणी तुंबण्याचा धोका वाढणार असल्याची भीती व्यक्त केली.

महापौर कला ओझा, स्थायी समिती सभापती विजय वाघचौरे व सभागृह नेते किशोर नागरे यांनी शुक्रवारी शहरातील व्हाइट टॉपिंगच्या रस्त्यांच्या कामांची पाहणी केली. सभापती वाघचौरे म्हणाले की, या कामांचा दर्जा चांगला असला तरी कामाचा वेग कमी असल्याने पावसाळ्यात नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. जेथे कामे सुरू आहेत तेथे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही सोय करण्यात आली नसल्याने आता लगेच पाऊस झाला तर रस्त्यालगतच्या घरांत व दुकानांत पाणी जाण्याचा धोका अधिक आहे. त्या दृष्टीने ठेकेदाराला सूचना करण्यात आल्या. तसेच विवेकानंदनगरच्या रस्त्यावर काही ठिकाणी तडे गेल्याचे समोर आले. त्याबाबतही अधिकारी व ठेकेदाराला सूचना देण्यात आल्या.
या वेळी विरोधी पक्षनेते रावसाहेब गायकवाड, गटनेते गजानन बारवाल, वॉर्ड ‘ब’चे सभापती दिग्विजय शेरखाने, कार्यकारी अभियंता सिकंदर अली व अफसर सिद्दिकी यांची उपस्थिती होती.

फोटो - व्हाइट टॉपिंगच्या कामांची पाहणी करताना महापौर कला ओझा.