आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Will Take Vilasraos Position In Marathwada For Congress

विलासरावांच्या अकली निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला आता मराठवाड्याचे रान मोकळे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना दुसरीकडे त्यांची जागा कोण घेणार, असा प्रश्नही चर्चिला जात आहे. त्यावर उत्तर नकारार्थी आहे. काँग्रेसमध्ये विलासरावांसारखा तुल्यबळ नेता नाही. त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीत दिसून येईल. मराठवाड्यात तर राष्ट्रवादी काँग्रेसला रान मोकळे मिळणार आहे, असा सूर सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळी, राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केला. विरोधकांतील एखादा बडा नेता काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात आले.
दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या विलासरावांना ग्रामपंचायतीपासून देशपातळीवरील प्रशासनाची जाण होती. ते फर्डे वक्ते, कुशल संघटकही होते. आघाडीचे सरकार चालवण्यात त्यांचा हातखंडा होता. सर्व पक्षांशी जवळीक राखत पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांवर अंकुश ठेवण्याचीही त्यांच्यात क्षमता होती. त्यांच्यासारखा मातब्बर, सर्वमान्य नेता काँग्रेसकडे सध्यातरी नाही. या पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीत काय होऊ शकते, मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारीत मराठवाड्याचे काय, असेही प्रश्न उपस्थित होत आहेत. 'दिव्य मराठी'ने या संदर्भात विविध राजकीय पक्षांच्या मान्यवरांची मते जाणून घेतली.
खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले की, विलासरावांनी आतापर्यंत राष्ट्रवादीला रोखले होते. त्या ताकदीचा नेता काँग्रेसकडे आता नाही. त्यामुळे 2014च्या निवडणुकीत मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढेल, असे दिसते. मुख्यमंत्रिपदाच्या राजकारणात पृथ्वीराज चव्हाण यांनी बिनधास्त राहावे, अशी स्थिती आहे. कारण अशोक चव्हाण आदर्श घोटाळ्यात खोलवर अडकले आहेत. किमान दोन वर्षे तरी ते त्यातून सुटणार नाहीत आणि नारायण राणेंना काँग्रेस र्शेष्ठी कधीच मान्यता देणार नाहीत.
माजी खासदार उत्तमसिंग पवार यांनी काँग्रेसला फटका बसणार असल्याची शक्यता फेटाळली. ते म्हणाले की, विलासरावांची कमतरता प्रचारात जाणवेल. त्याचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता नाही. आम्ही सर्व काँग्रेसची स्थानिक नेतेमंडळी राष्ट्रवादीला रोखण्यास सर्मथ आहोत. मात्र, अशोक चव्हाण वगळता राज्य पातळीवर मुख्यमंत्रीपदासाठी दावेदारी करणारा नेता मराठवाड्यात नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि ते तर आदर्शमध्ये अडकले आहेत.
औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन सुरेश पाटील म्हणाले की, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची हातोटी विलासरावांमध्ये होती. त्यांना वक्तृत्वाची अमोघ देणगी होती. सर्वस्तरातील प्रश्न त्यांना माहित होते. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी त्यांचे उत्तम संबंध होते. तेवढय़ा तोलामोलाचा काँग्रेसमध्ये कुणीही नाही. याचा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फटका बसणार की नाही, हे आताच सांगता येणार नाही. पण मराठवाड्याची मुख्यमंत्रीपदाची दावेदारी कुमकुवत झाली, एवढे नक्की.
माजी मंत्री, भाजपचे नेते हरिभाऊ बागडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्या मते विलासरावांच्या जाण्याने सर्वाधिक फायदा राष्ट्रवादीला होणार आहे. ते म्हणाले की, येणार्‍या काळात महाराष्ट्रासोबत मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का बसेल. काँग्रेसच्या अनेक जागा राष्ट्रवादीकडे जातील. कारण अजित पवारांच्या रणनितीला तोडीस तोड उत्तर देऊ शकेल, असा नेता काँग्रेसकडे नाही.
प. महाराष्ट्राशी लढण्याची पात्रता आता उरली नाही- ज्याच्या जाण्याने मराठवाड्याने दु:ख व्यक्त करावे, असे विलासराव शेवटचे नेते होते. त्यांचा केवळ राजकारणच नव्हे तर साहित्य, नाट्य अशा क्षेत्रांचा अभ्यास होता. आता पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसशी लढण्याची पात्रता मराठवाड्यात राहिलेली नाही. परंतु, विलासराव नसल्याने महाराष्ट्रात काँग्रेसचे मतदान घटेल, असे वाटत नाही. अजित पवार ज्या पद्धतीने आक्रमक राजकारण करत आहेत. ते पाहता आगामी विधानसभेत मराठवाड्यात राष्ट्रवादीची ताकद वाढण्याची शक्यता आहे.' -प्रा. जयदेव डोळे, राजकीय घडामोडींचे अभ्यासक
अमित देशमुख यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान दिले जाण्याची शक्यता
विलासरावांनी यशवंतरावांचा वारसा जपला : शरद पवार
विलासराव सदैव गरिबांच्या बाजूने उभे राहिले : सुशीलकुमार शिंदे
विलासरावांच्या रुपाने उमदा, सच्चा मित्र गमावला- गोपीनाथ मुंडे