आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कार प्रकरण: आरोपी कोणीही असोत, कठोर कारवाई होईलच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सोमवारी जिन्सी बलात्कार प्रकरणातील पीडित बालिकेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांनी आठ वर्षांच्या पीडित बालिकेची विचारपूस केली. या प्रकरणातील आरोपी कोणीही असोत, त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. यासंदर्भात पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊ, असे रहाटकर यांनी सांगितले.
भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी दोन दिवसांपूर्वी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यांनी ही बाब आयोगाच्या अध्यक्षा रहाटकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर सोमवारी रहाटकरांनी या कुटुंबीयांची भेट घेतली. या वेळी नगरसेवक राहुल खरात, जगदीश सिद्ध, लक्ष्मण कुलकर्णी, अजय चावरिया यांची उपस्थिती होती.

जिन्सीतील सुप्रीम ग्लोबल स्कूलमध्ये शिकणाऱ्या आठ वर्षांच्या बालिकेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी पोलिसांनी अरबी भाषेचा शिक्षक अहमद खान आमिर खान (३८, रा. मंजूरपुरा) याला अटक केली. दोन दिवसांनंतर या प्रकरणात तीन रिक्षाचालकांसह एका संगणक शिक्षकाचाही सहभाग असल्याचा नातेवाइकांनी आरोप होता.

बालपण हरवले
खेळण्या-बागडण्याच्यावयात आमच्या मुलीला मरणयातना सोसाव्या लागत आहेत. आमच्या समाजातील नेतेही हे प्रकरण दडवण्याचा प्रयत्न करीत आहेत. घाबरलेल्या मुलीला योग्य उपचाराची गरज आहे. त्या चिमुकलीच्या वेदनांकडे पाहून तरी आम्हाला न्याय द्या, आशा भावना पीडितेच्या आईने रहाटकर यांच्याकडे व्यक्त केल्या तेव्हा रहाटकर भावुक झाल्या.
बातम्या आणखी आहेत...