आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Defeat In By Polls In Satara Deolai Uddhav Thackeray

सातारा,देवळाईत ‘नेटवर्क स्ट्राँग’ असूनही पराभव का, ठाकरेंचा रामदास कदम, खैरेंना सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सातारा,देवळाईत नेटवर्क स्ट्राँग आहे. मतदानाच्या एक दिवस आधी २४४ जोडप्यांचा विवाह सोहळाही झाला. तरीही दोन्ही वाॅर्डांत पराभव का झाला, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला अन् पालकमंत्री रामदास कदम खासदार चंद्रकांत खैरे निरुत्तर झाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार संजय शिरसाट यांनी मला पूर्ण निवडणूक प्रक्रियेत डावलले, अशी तक्रार केली होती. त्यानंतर ठाकरे यांनी बुधवारी रात्री उशिरा दोन्ही नेत्यांची मुंबईत झाडाझडती घेतली. तेव्हा साताऱ्यात निसटता पराभव झाला.
मतांची आकडेवारी पाहिली तर सेनेचा जनाधार कायम असल्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्यावर एका वाॅर्डात भाजपने विजय मिळवला, हे समजू शकतो. परंतु, दुसरा वाॅर्ड आपल्या हातातून थेट काँग्रेसच्या ताब्यात कसा जातो, यावर मंथन झाले, असे सूत्रांनी सांगितले.
पुढे वाचा.. खासदार निधी वापराचा हिशोब द्या, भाजपचा खैरेंवर थेट हल्ला, शिवसेना मजबूत होणार असेल तर माझे दोन्ही तंगडे तोडा! राजेंद्र जंजाळ​