आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमाचे असेही उदाहरण; पतीला किडनी देऊन जीवदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - अगदीछोट्या छोट्या कारणावरून वाद विकोपाला जाऊन पती-पत्नी विभक्त होण्याचे अनेक प्रकार घडतात. परंतु दोन्ही किडन्या निकामी झालेल्या पतीला किडनी देऊन पल्लवी दाभाडे (३३) या सर्वांसमोर नवीन आदर्श ठेवणार आहेत. ११ जूनला त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असून १३ रोजी त्या पती विनोद पुंडलिकअप्पा दाभाडे (४०) यांना अनोखी भेट देतील.
मूळचे नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील विनोद यांचे इलेक्ट्रिकलचे दुकान आहे. त्यांना नऊ वर्षाची भूमी आणि पाच वर्षांची सृष्टी अशा दोन मुली आहेत. मागील एक वर्षांपासून त्यांच्या पोटात दुखत होते. सुरुवातीला त्यांनी दुखणे अंगावर काढले. त्रास असह्य झाल्यानंतर त्यांनी तपासण्या करून घेतल्या. यात दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे कळाले. कमाई जेमतेम असल्याने उपचार कसा करायचा असा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर होता.

७० वर्षीय आईचीही किडनी देण्याची होती इच्छा : आपल्यामुलाच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे कळाल्यावर संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. ७० वर्षीय आई विमलाबाई यांनी मुलाला किडनी देण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु वय जास्त असल्याने किडनीची कार्यक्षमता कमी राहील, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळे दुसऱ्या किडनीदात्यांचा शोध सुरू झाला. पण किडनीदाता मिळाला नाही. एकाचा शोध लागला पण यासाठी २५ लाख रुपयांचा खर्च येईल असे, त्यांना सांगण्यात आले. परंतु घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे एवढा खर्च पेलू शकणाऱ्या दाभाडे कुटुंबीयांना काय करावे ते कळत नव्हते.

अखेर पत्नीने किडनी देण्याचा निर्णय घेतला
विनोददाभाडे सहा महिन्यांपासून डायलिसिसवर आहेत. अथक प्रयत्नातून किडनी मिळत नसल्याने पत्नी पल्लवी यांनी किडनी देण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनंतर किडनी मॅच झाली. मागील दहा दिवसांपासून ते गजानननगर येथे नातेवाइकांकडे राहत आहेत. दाभाडे यांचे धूत रुग्णालयात १३ जूनला डॉ. रवींद्र भट्टू शस्त्रक्रिया करणार आहेत.

गरीब परिस्थितीमुळे विकला प्लाॅट
किडनी प्रत्यारोपण करण्यासाठी चार लाखांपेक्षा जास्त खर्च लागणार आहे. त्यामुळे या दांपत्याने त्यांचा प्लॉट विक्री केला आहे. यासाठी आमदारांनी एक लाखाची मदत केली तर त्यांचे पुतणे कृष्णा अविनाश दाभाडे, पत्नी दीपाली दाभाडे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. परंतु दांपत्याला आणखी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.

पतीला अनोखी भेट देणार
माझ्यासाठी पतीमहत्त्वाचे आहेत. त्यांना जीवदान देण्यासाठी मी किडनी देण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाच्या वाढदिवसालाच मी ही अनोखी भेट देणार आहे. - पल्लवी विनोद दाभाडे.
विनोद दाभाडे
बातम्या आणखी आहेत...