आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीचे \'केजी\'त अॅडमिशन करुन परत येत होते दाम्पत्य, मागून येणाऱ्या वाहनाच्या धडकते दोघे ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फर्दापूर (औरंगाबाद) - फर्दापूर येथील जळगाव-औरंगाबाद महामार्गावर एका दुचाकीला पाठीमागून अज्ञात वाहनाने दिलेल्‍या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्‍यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास घडली. सुदैवाने 4 वर्षांची मुलगी वाचली आहे. 
 
 मुलीचे शाळेत अॅडमिशन करुन निघाले होते घरी.. 
 - जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथील इम्रान खान सरताज खान (वय 30) हे त्यांची पत्नी अनिसाबी (वय 25) आणि मुलगी शिफा (वय 4) यांच्यासह गावी परत येत असताना अपघात झाला. 
 - फर्दापूर जवळ खानदेश-मराठवाडा सीमेवरील पुलावर अज्ञात वाहनाने इम्रान खान यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यात दोघेही पती-पत्नी जागेवरच गतप्राण झाले. मुलीचे नशिब बलवत्तर म्हणून ती वाचली असे घटनास्थळी हजर असलेल्यांनी सांगितले. 
 - जळगाव येथील मित्तल हायस्कूलमध्ये मुलगी शिफाच्या अॅडमिशनसाठी खान दाम्पत्य गेले होते. तेथून परत येत असताना हा अपघात झाला. 
 - या घटनेची माहिती मिळताच फर्दापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद जऱ्हाड, जमादार राजु काकडे, संदिप सुसर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्‍छेदनासाठी सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...