आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wildlife Animals News In Marathi, Tiger, Lione, Elephant, Divya Marathi

वाघ, सिंह, बिबट्यांसाठी कूलर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गारपीट आणि पावसाचा झटका ओसरल्यानंतर तापमानाने चाळीस अंशांच्या दिशेने आगेकूच सुरू केल्याने सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांचा उन्हाळय़ापासून बचाव करण्याच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. पाच पिंज-यांना कूलर लावण्यात आले असून हत्तींना दिवसातून दोनदा अंघोळ घालण्याच्या तसेच पिंर्ज‍यांतील हौदांत पाणी ठेवणे, पाण्यात गूळ टाकणे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.


प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना उन्हाळय़ाच्या तडाख्यापासून वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. यंदाही उन्हाळय़ाची चाहूल लागताच ही कामे सुरू झाली आहेत. वाघ, बिबट्या आणि सिंह या प्राण्यांच्या पिंर्ज‍यांना एकूण पाच कूलर्स लावण्यात आले असून इतर प्राण्यांच्या बाबतीतही उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्राण्यांच्या पिंजर्‍यताील हौद कायम पाण्याने भरून ठेवण्यात येणार आहेत. पिंर्ज‍याच्या आजूबाजूला असलेल्या पाणीसाठय़ाच्या जागाही पाणी भरून तयार ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून पिंर्ज‍याबाहेर आलेल्या या प्राण्यांना उन्हाच्या काहिलीपासून वाचवता येईल. शिवाय प्राण्यांना उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून पाण्यात गूळ टाकण्यात येणार आहे.


तरस, लांडगे, कोल्हे या प्राण्यांच्या पिंर्ज‍यांत दिवसातून तीन वेळा पाणी भरून ठेवले जाणार आहे. सापांच्या बॉक्समध्ये पाणी ठेवण्यात येणार असून उद्यानातील हिरवळीवरही दिवसा पाण्याचे फवारे मारून तापमान आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. 189 प्राणी असलेल्या या संग्रहालयातील हत्ती हे आबालवृद्धांचे आकर्षण असून जीवघेण्या उन्हापासून त्याचा बचाव करण्यासाठी त्याला दिवसातून दोन वेळेस अंघोळ घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.