आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wildlife Bird Photography At Keoladev National Park By Shrikrishna Patil

WorldPhotographyDay: आकाशी झेप घे रे पाखरा, पाहा केवलादेव अभयारण्यातील पक्ष्यांची वनक्रीडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहाटे -पहाटे उठलात तर पक्ष्यांचा किलबिलाट तुमच्या कानावर नक्कीच पडेल. या पक्ष्यांची किलबिल इतकी मंजुळ असते की, सतत ऐकत रहावं असं प्रत्येकाला वाटायला लागतं. मात्र काही पक्षी हे खुप लहान असतात तर काही पक्षी झाडाच्या एकदम वर कुठेतरी पानांत लपलेले असतात. त्यामुळे कोणता आवाज कोणाचा आहे हेच मुळी कळत नाही. तसेच आपल्या आसपास अनेक पक्षी असतात मात्र आपल्यातील पक्षी अज्ञानामुळे आपल्याला त्यांना ओळखता येत नाही आणि त्याची कधी आपल्याला गरज वाटली नाही. परंतु पक्षी मित्रांना या पक्षांची आवाजावरूनच कल्पना होते. त्यांना बरोबर ठाऊक असते की, कोणता पक्षी कुठे आढळतो आणि त्याचा आवाज कसा आहे. असेच एक पक्षीमित्र आणि वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहेत औरंगाबादचे श्रीकृष्ण पाटील.
शालेय वयापासूनच चित्रकलेची आवड असणारे श्रीकृष्ण पाटील यांनी शिक्षण संपल्यावर फोटोग्राफीच्या शिक्षणास सुरूवात केली. फोटोग्राफीमध्ये अनेक प्रयोग करत असताना त्यांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफीची आवड लागली. वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्येही विशेषकरून त्यांची आवड आहे पक्षी. विविध पक्षांना आपल्या कॅमेऱ्याद कैद करण्यासाठी ते सतत धडपड करत असतात. त्यामुळेच त्यांची नजर कोठेही गेल्यावर एखाद्या झाडावर कोणता पक्षी आहे याकडेच असते. त्यामुळे पक्षांच्या विविध जाती प्रजाती आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी ते भारत भ्रमणावर नेहमी जात असतात. याच पक्ष्यांचे आकर्षण त्यांना राजस्थान येथील केवलादेव राष्ट्रीय अभयारण्यात घेऊन गेले. या अभयारण्यात त्यांनी टीपलेले पक्षांचे फोटो खुपल विलोभनीय आहेत. या फोटोंमधून पक्ष्यांचा स्वभाव टीपण्याचा त्यांनी पुरेपुर प्रयत्न केला आहे. चला तर मग जाऊयाच श्रीकृष्णसोबत त्यांच्या या वाईल्ड लाईफ सफरीला....
टीपः फोटोसोबत पक्षाचे नाव, कॅमेरा, आणि कोणती लेंस वापरण्यात आली आहे याची माहिती दिली आहे.
श्रीकृष्ण पाटील यांच्या फेसबुक पेजला भेट द्या..
https://www.facebook.com/ShrikrishnaPatilPhotography
पुढील स्लाईडवर, इतर पक्षांचे फोटो पाहा आणि घ्या अस्वाद Wild Bird Photography चा...