औरंगाबाद - सेट टॉप बॉक्सचे उत्पादन करणार्या भारतीय उत्पादकांना वाव मिळावा यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने शंभरवर भारतीय कंपन्यांना
ट्विटरमार्फत बोलावणे पाठविले आहे. त्यासाठी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. जावडेकरांनी शिव खेरा यांची प्रेरणादायी कार्यशाळा आयोजित करून विभागातील अधिकारी व कर्मचार्यांना सोशल साइट्सवर आगामी काळात भर राहील, असा संदेश दिला आहे.
मोदी सरकारचा जास्तीत जास्त भर सोशल साईटवर असल्याचे याआधी स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने ज्या प्रभावीपणे सोशल मीडियाचा वापर केला तो प्रभाव सत्ता आल्यानंतरही कायम ठेवण्याचा व त्यात वाढ करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. त्या अनुषंगाने केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी 21 जून रोजी ट्विट करून भारतीय सेट टॉप बॉक्स उत्पादकांना चर्चेचे निमंत्रण पाठविले आहे. ‘‘ Indian manufacturar to produce and provide indigenous of digitigationll" संदेश जावडेकर यांनी पाठविला. दूरदर्शन ही प्रेक्षकांची प्रथम पसंती बनावी यासाठी मोठय़ा प्रमाणावर खल सुरू आहे. कुठल्या कार्यक्रमांची निवड करायची आदीसंबंधी संशोधन सुरू आहे. गोवा येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे केंद्र यापूर्वी तात्पुरते होते त्यास कायम करण्यात आले आहे. यापुढे महोत्सव कायमस्वरूपी गोवा येथेच होईल.
अनेक कारणांनी प्रलंबित फाईल्स जावडेकर यांनी 20 दिवसांत निकाली काढल्या. पर्यावरण व वने हा विभाग जावडेकरांकडे असल्याने त्यांनी नियंत्रण रेषेपासून (एलएसी) श्ांभर कि.मी. अंतरात असलेल्या संरक्षण विभागाच्या प्रकल्पांना पर्यावरण व वन विभागाची परवानगी घेण्याची गरज ठेवली नाही. तसे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.
प्रभावी अंमलबजावणी
ट्विटर,
फेसबुक, व्हाटस अप यासह इतरही अनेक सोशल नेटवर्किंग साइटचा वापर दैनंदिन कारभारात वाढविण्यासाठी आग्रह धरला जात आहे. महत्त्वाचा निर्णय ट्विटर अथवा फेसबुकवर तत्काळ टाकण्याची व्यवस्था केली आहे. संतोष अजमेरा, उपसंचालक, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय