आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोर्तुगालच्या विद्यापीठांत मिळणार शिक्षणाची संधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पोर्तुगालच्या चार विद्यापीठांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा शैक्षणिक आदानप्रदानचा प्रस्ताव मान्य केला आहे. यासंदर्भाचे अधिकृत पत्र इरास्मस प्लस मुंडसचे येथील प्रमुख डॉ. यशवंत खिल्लारे यांना प्राप्त झाले आहे. लवकरच विद्यापीठादरम्यान सामंजस्य करार करण्यात येणार असून सर्वच विद्याशाखांतील विद्यार्थ्यांना या चारही विद्यापीठात शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. युरोपियन देशातील विविध विद्यापीठांनी येथील विद्यापीठाशी यापूर्वीच अनेक करार केले आहेत. त्यात आता पोर्तुगालची भर पडली आहे. स्पेन, ग्रीस देशांमधील ११ विद्यापीठे आधीपासून शैक्षणिक आदानप्रदान करत आहेत.
सामाजिकशास्त्रे, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्याशाखेतील आतापर्यंत ५० विद्यार्थ्यांनी विदेशी विद्यापीठात काही काळ शिक्षण घेतले आहे.
पोर्तुगालच्या चार विद्यापीठांना डॉ. खिल्लारे यांनी नोव्हेंबर-२०१५ दरम्यान प्रस्ताव पाठवले होते. फेब्रुवारी-२०१६ दरम्यान आणखी काही कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गुरुवारी (१६ जून) त्यांनी प्रस्ताव मंजूर केला आहे. नावा दी लिसोबा, डो-अलगार्वे, ट्रायस-ओस-मांटोस अल्टो ड्युरो आणि ड्यु पोर्लो या विद्यापीठांचा त्यात समावेश आहे. त्यांनी सहा प्रवर्गातील प्रस्ताव मान्य केल्याचे पत्र दिले आहे. पोर्तुगाल आणि येथील विद्यापीठात लवकरच सामंजस्य करार करण्यात येणार आहे. चारही विद्यापीठांत पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थी-प्राध्यापक आता शैक्षणिक आदानप्रदानसाठी पाेर्तुगालच्या विद्यापीठात जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एका विद्यार्थ्याला सुमारे चार ते पाच लाख रुपयांचा खर्च येतो, हा खर्च युरोपीय युनियन देणार असल्याचे डॉ. खिल्लारे यांनी स्पष्ट केले आहे.

सहा विद्यार्थ्यांना तुर्कीची फेलोशिप
इरास्मस मुंडस अंतर्गत तुर्की येथील विद्यापीठे आपल्या विद्यापीठाच्या सहा विद्यार्थ्यांना फेलोशिप देत आहे. ही फेलोशिप फक्त विज्ञान विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना मिळत असून अभियांत्रिकी आणि जैवतंत्रज्ञानच्या सहा विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. पोर्तुगालचा प्रस्ताव पदवी, पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.
बातम्या आणखी आहेत...