आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील पाण्याचा एक थेंबही गुजरातला जाऊ देणार नाही; राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- केंद्र सरकारने आता आपल्या अधिकारांचा वापर करीत राज्यातून नार- पार आणि पिंजाळच्या माध्यमातून पाणी पळविण्याचा उद्योग सुरू केला आहे. मात्र, राज्यातून पाण्याचा एक थेंबही गुजरात जाऊ देणार नाही. आता आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिला. 


नाशिक येथील कृषिथाॅन प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आलेल्या विखे पाटील यांनी पत्रकारांसोबत संवाद साधताना सांगितले की, राज्यातील सरकार हे केंद्र सरकारच्या दबावाखाली काम करत आहे. राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. कोणत्याही योजना मिळत नाही, मात्र जाहिरातीच्या माध्यमातून केवळ लाभार्थी असल्याचे दाखविले जात आहे. प्रत्येकवेळी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याचे काम हे सरकार करीत आहे. तसेच विदर्भात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या असूनही शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष लोकांना मूर्ख बनविण्याचे काम करीत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कोणताही विकास होण्याची शक्यता नसल्याचे विखे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...