आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डीबी स्टारचे स्टार्स’ स्पर्धेत जिंका चांदीची नाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डीबी स्टारमध्ये आवडत्या वाचनीय बातम्यांसोबत वाचकांना आता चांदीची नाणी जिंकण्याची संधी मिळणार आहे. दैनिक ‘दिव्य मराठी’च्या वतीने मंगळवारपासून ‘डीबी स्टार्सचे स्टार’ स्पर्धा सुरू होत असून या स्पर्धेअंतर्गत दर रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी ‘दिव्य मराठी’मध्ये काही प्रश्न प्रसिद्ध केले जातील. त्यांची अचूक उत्तरे त्याच दिवशी ‘डीबी स्टार’मध्ये असतील. ती उत्तरे शोधून वाचकांनी एसएमएसद्वारे पाठवायची आहेत.
अचूक उत्तरांमधून सोडत पद्धतीने (लकी ड्रॉ) विजेता निवडून वरील तिन्ही दिवशी चांदीची नाणी बक्षीस दिली जातील. त्याची माहिती डीबी स्टारमध्ये दिली जाईल. स्पर्धेसंदर्भात अधिक माहिती ‘दिव्य मराठी’मध्ये प्रसिद्ध होणार्‍या प्रश्नांसोबत दिली जाईल.
वाचत राहा ‘डीबी स्टार’. चांदीच्या या नाण्यांचे कदाचित तुम्ही होऊ शकाल दावेदार