आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीनशे किलोमीटर्सवरून केले प्रकल्पाचे लोकार्पण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देशातील सर्वात मोठ्या पवन ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी कंेद्रीयमंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते करण्यात आले. ३०० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात खरविरे येथे आहे. तिथपर्यंत जाण्यात वेळ जाईल म्हणून ३०० किलो मीटर्स अंतरावरून औरंगाबादच्या हाॅटेलमधूनच गोयल यांनी या ४७.६ मेगावॅट वायुऊर्जा प्रकल्पाचे उद््घाटन करून राष्ट्राला प्रकल्प अर्पण केल्याची घोषणा केली.
गोयल यांनी रविवारी दिवसभरात तीन कार्यक्रमांना हजेरी लावली. दुपारी तीन वाजता हॉटेल लेमन ट्री येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर तिथेच खिरविरे पवन ऊर्जा प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण केले. कोळसा घोटाळा ते देशातील ऊर्जेची परिस्थितीवर त्यांनी विस्तृत माहिती दिली. कोळसा घोटाळ्यातील मुख्य आरोपींना शिक्षा कधी होणार, ते कोण आहेत, किती जण आहेत असा पहिलाच प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करीत आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

या प्रकरणाचा क्लोज रिपाेर्ट दिला होता. मात्र न्यायालयामुळेच हे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने देशातील न्यायव्यवस्था किती चांगली आहे हे स्पष्ट होते. यातून कुणीही सुटणार नाही, असा घोटाळा पुन्हा होणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत.

परळीप्रकल्पाच्या राखेतून सिमंेटनिर्मिती : परळीयेथील अौष्णिक प्रकल्पातून निघणाऱ्या राखेमुळे शेतकऱ्यांना त्रास होत आहे? या प्रश्नावर गोयल म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अशा प्रकल्पांवर चांगला उपाय शोधला आहे. राखेपासून सिमेंट तयार कण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी केले लोकार्पण
केंद्र सरकारच्या एसजेव्हीएन या कंपनीने अहमदनगर जिल्ह्यातील खिरविरे या गावात ४७.६ मेगावॅट क्षमतेचा वायुुऊर्जा प्रकल्प उभारला आहे. त्याचे लोकार्पण तब्बल दोन वर्षे उशिरा झाले. तेही शहरातील हॉटेल लेमन ट्री येथे कोनशिला उभारून. असे का केले? या प्रश्नावर गोयल म्हणाले की, वेळेअभावी मला अहमदनगरला जाणे झाले नाही. त्यामुळे औरंगाबादलाच औपचारिक उद््घाटन घोषणा केली. या वेळी व्यासपीठावर एसजेव्हीएन कंपनीचे अधिकारी आर. एन. मिश्रा, आमदार अतुल सावे, जिल्हाधिकारी निधी पांडे आदींची उपस्थिती होती.

मे २०१७ पर्यंत प्रत्येक गावात वीज
गोयल म्हणाले, मोदी सरकार आले तेव्हा देशातील १८ हजार ४५२ गावांना वीज नव्हती. त्यांनी १५ ऑगस्टला घोषणा करत हजार दिवसांत या सर्व गावांत वीज पोहोचवू. मे २०१८ चे टार्गेट आम्ही एक वर्ष आधीच म्हणजे मे २०१७ पर्यंत पूर्ण करू. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योगांना देशात सर्वात महाग वीज का? या प्रश्नावर गोयल म्हणाले की, ही बाब आम्ही राज्य सरकारवर सोपवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर नक्कीच चांगला पर्याय देतील. उद्योगांसाठी विशेष पॅकेज लवकरच मिळेल.
बातम्या आणखी आहेत...