आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूचे दुकानाला महिलांनीच ठोकले ‘कुलूप’; दीडशे महिलांचा तब्बल तासभर रस्ता रोको

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तळणी- गावातील वस्तीत असलेले दारूविक्रीचे दुकान बंद अथवा स्थलांतर करण्यासाठी २००९ पासून ग्रामस्थ, महिलांचा पाठपुरावा सुरू होता. यासाठी पोलिस विभाग, तहसीलदार, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्याकडे तब्बल २० ते २५ वेळा निवेदनाद्वारे मागणी करूनही हे दुकान बंद अथवा स्थलांतरित केले जात नसल्यामुळे मंगळवारी शंभर ते दीडशे महिलांनी एकत्र येत या दुकानाला कुलूप लावून ११ ते या वेळेत भरउन्हात रस्ता अडवून धरला. 

गेल्या अनेक दिवसांपासून तळणीसह परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्रीचे व्यवसाय वाढले आहेत. यातच गावाच्या वडार वस्तीमध्येच दारूविक्रीचे दुकान असल्यामुळे ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास वाढला होता. विशेषकरून महिलांना या गोष्टींना जास्त तोंड द्यावे लागत आहे. 

गावात सहजच दारू उपलब्ध होत असल्यामुळे तरुण पिढीही व्यसनाकडे वळली आहे. याचा परिणाम म्हणून तरुण मंडळी व्यसनाच्या आहारी जाऊन अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. हे दुकान गावाच्या बाहेर स्थलांतरित अथवा बंद करण्याची गावातील महिला २००९ पासून प्रशासनाच्या विविध विभागांकडे करीत आहेत. 
 
परंतु प्रशासनाच्या कोणत्याच विभागाने याची दखल घेतली नाही. यामुळे गावात वाद होणे, महिलांना त्रास वाढण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या होत्या. पोलिस प्रशासनाकडूनही या प्रकाराकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने परिसरातील शंभर ते दीडशे संतप्त महिलांनी एकत्रित येत त्या दुकानाला कुलूप ठोकले. यानंतर चार तास रास्ता रोको करून आंदोलन केले. यानंतर पोलिस निरीक्षक रफिक शेख यांनी मध्यस्थी करून आश्वासन देण्याचा प्रयत्न केला असता, महिलांनी तहसीलदार आल्याशिवाय उठणार नसल्याचा पवित्रा घेतला. त्यानंतरही एक तासभर महसूलचे कुणीच अधिकारी आले नव्हते. 

तीन तासांनंतर नायब तहसीलदार एस. व्ही. ताडेवार हे आले. त्यांनी आजच सर्व अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर महिलांनी आंदोलन सोडले. परिणामी महिलांनी घेतलेल्या पावित्र्यामुळे पसिसरात मोठ्या प्रमाणात वाहणांची रांग होती. 

इतर गावांतील दारूविक्री बंद करणार 
तळणीपरिसरातील काही गावांमध्येही दारूविक्री होते. ही विक्री बंद करण्यासाठी गावातील महिला संयुक्त महिला समिती स्थापन करण्याच्या कामास सुरुवात केली आहे. यावर पुढेही काम करणार आहेत. 

प्रशासकीय अधिकारी येतात दुकान मालकाच्या वाहनात 
तळणी येथील गावातील दुकान बंद करण्याची महिलांनी वारंवार मागणी केली आहे. परंतु ज्या अधिकाऱ्यांकडे हे दुकान बंद करण्यासाठी निवेदन दिले ते अधिकारीच दुकान मालकाच्या गाडीत बसून येतात. या आर्थिक हितसंबंधांमुळे संपूर्ण गावाची मागणी असतानाही अधिकाऱ्यांच्या आर्थिक संबंधांमुळे हे दुकान बंद होईना. 

वारंवार निवेदनाद्वारे होतेय मागणी 
नऊव र्षांपासून दुकान बंद करण्याची मागणी केली आहे. कुठलीच कारवाई झाली नसल्यामुळे महिलांनी एकत्रित येत पाऊल उचलले. दुकान बंद झाल्यास उपोषण करणार. 
- पार्वती मुद्दलवार, अध्यक्षा, सावित्रीबाई बहुउद्देशीय महिला मंडळ. 

नायब तहसीलदाराला धरले धारेवर 
नायब तहसीलदार एस. ताडेवार यांनी आंदोलनाला भेट दिली असता, तुमच्या गावचे निवेदन आले नसल्याचे बोलताच महिलांनी अजून संतप्त होत “पुरावे दाखवतो’ असे म्हणत नायब तहसीलदाराला धारेवर धरले. 

तहसीलदारांचे कानावर हात 
ग्रामस्थांनी हे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी एप्रिल रोजीच निवेदन दिले. परंतु संबंधित तहसीलदार, नायब तहसीलदार आमच्याकडे निवेदन आले नसल्याचे सांगतात. यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 
बातम्या आणखी आहेत...